५१ वर्षीय महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 07:51 PM2018-09-01T19:51:01+5:302018-09-01T19:52:49+5:30

घाबरलेल्या महिलेने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. जेठीया यांनी दिलेल्या खाते क्रमांकावर सुरूवातीला २५ हजार रुपये भरले. त्यानंतर टप्याट्याने तिला ४ लाख ४० हजार भरण्यास भाग पाडले. मात्र, फोनवरून पैशांची मागणी थांबतच नसल्याने पीडित महिलेला संशय आला.

The 51-year-old woman fall in love via facebook and looted lakhs rupee | ५१ वर्षीय महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात 

५१ वर्षीय महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात 

Next

मुंबई - फेसबुकवरील मैत्री भांडुपमधील ५१ वर्षीय महिलेला चांगलीच महागात पडली. दोन अनोळखी ठगांनी महिलेचा विश्वास संपादन करून भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने तब्बल साडेचार लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आता भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल जाण्यासाठी धाव घेतली असून पोलिस आरोपींच्या मागावर आहेत. 

मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत पीडित महिला ही आपल्या कुटुंबियांसमवेत राहते. जुलै महिन्यात पीडित महिलेची ऑक्सर रोनाल्ड या अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. पीडित महिलेने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांमध्ये मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. महिन्याभरातच पीडितेचा विश्वास आॅक्सरने जिंकून आपण कॅनडियन नागरिक असल्याचे त्याने महिलेला सांगितले होते. पहिल्यांदात भारतीय अनोळखी व्यक्तीशी इतका बोलत असून त्याने महिलेला तिचा स्वभाव आवडल्याचे सांगितले. त्यामुळेच आपण एक महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे महिलेला सांगितले. 

त्यानंतर दोन दिवसांनी तिला जेठीया मिश्रा या नावाच्या व्यक्तीने एअरपोर्टवरील कस्टम कार्यालयातून फोन केला. कॅनडाहून तुमचे आलेले पार्सल हे महागडे असून त्यासाठी पैसे भरावे लागतील. अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. पैसे भरण्यासाठी तुम्ही न येता परस्पर बँक खात्यावरही भरू शकता असे सुचवले. त्यानुसार घाबरलेल्या महिलेने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. जेठीया यांनी दिलेल्या खाते क्रमांकावर सुरूवातीला २५ हजार रुपये भरले. त्यानंतर टप्याट्याने तिला ४ लाख ४० हजार भरण्यास भाग पाडले. मात्र, फोनवरून पैशांची मागणी थांबतच नसल्याने पीडित महिलेला संशय आला. त्यानंतर तिने ऑक्सरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्याचा फोन नाॅट रिचेबल येत होता. त्यानंतर महिलेने पुन्हा जेठीया नावाच्या व्यक्तीने केलेल्या फोननंबरवर संपर्क साधला असता. त्याचा देखील फोन नाॅट रिचेबल येत होता.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: The 51-year-old woman fall in love via facebook and looted lakhs rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.