50 lakh cash seized in Taddev area of Mumbai | मुंबईतील ताडदेव परिसरात ५० लाखाची रोकड जप्त  
मुंबईतील ताडदेव परिसरात ५० लाखाची रोकड जप्त  

मुंबईमुंबई शहर जिल्हयात ताडदेव सर्कल भागात काल रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे ५० लाख रुपये संशयीत रक्कम पकडली. याबाबत ताडदेव पोलिस ठाणे मार्फत अधिक तपास सुरु आहे.

    याबाबतची अधिक माहिती अशी,  शनिवारी  मध्यरात्री सुमारास ताडदेव परिसरात पारसी अगयारी जवळ, सरदार पावभाजी चे पुढील बाजूस, ताडदेव रोड, ताडदेव सर्कल, मुंबई येथे फिरत्या तपासणी पथकाला पाहणी करीत असता,  लाल रंगाच्या लॅन्ड रोव्हर (डिस्कवरी) या मोटार कारची (एम.एच.01 सी.एच.0707) तपासणी केली.  त्यात प्रशांत रमेशचंद्र समदानी यांच्या कडे उपरोक्त रक्कम आढळून आली. 

याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. 


Web Title: 50 lakh cash seized in Taddev area of Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.