हिंगोलीतील गारमाळ परिसरातून १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 06:15 PM2018-08-29T18:15:41+5:302018-08-29T18:16:44+5:30

शहरालगतच्या गारमाळ परिसरातील एका घरातून शहर पोलिसांनी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा मारून तब्बळ १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त केला.  

1400 liters of illegal kerosene were seized from the Hingoli Garamal area | हिंगोलीतील गारमाळ परिसरातून १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त

हिंगोलीतील गारमाळ परिसरातून १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त

Next

हिंगोली : शहरालगतच्या गारमाळ परिसरातील एका घरातून शहर पोलिसांनी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा मारून तब्बळ १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त केला.  

हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरातील चंदू प्यारेलाल यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रॉकेसाठा साठवून ठेवल्याची गोपनिय माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलिस व महसूल प्रशासनाच्या पथकाने प्यारवाले यांच्या घरावर छापा टाकला. 

या कारवाईत पोलिसांनी घरातील १४०० लिटर अवैध रॉकेलसाठा जप्त केला. यावेळी घरामध्ये मात्र कोणीच नव्हते.दुपारी १ वाजल्यापासून पथक गारमाळ परिसरात पाळत ठेऊन होते. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरूच होती. सदर कारवाई पोनि उदयसिंग चंदेल, नायब तहसीलदार शिवाजी खोकले,  पीएसआय प्रकाश कांबळे, सुधीर ढेंबरे, नीळकंठ दंडगे, शेख मुजीब, जीवन मस्के आदींनी केली.

Web Title: 1400 liters of illegal kerosene were seized from the Hingoli Garamal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.