१०० ब्रास अवैध रेतीसाठा पकडला; ट्रक्टरमालकावर ४ लाख ६१ हजार ६०० रुपयाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 10:10 PM2019-02-07T22:10:18+5:302019-02-07T22:12:03+5:30

तहसीलदार राहुल सारंग यांनी याप्रकरणात प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.

100 brass caught illegal sandstorm; 4 lakh 61 thousand 600 rupees penalty for tractor mall | १०० ब्रास अवैध रेतीसाठा पकडला; ट्रक्टरमालकावर ४ लाख ६१ हजार ६०० रुपयाचा दंड

१०० ब्रास अवैध रेतीसाठा पकडला; ट्रक्टरमालकावर ४ लाख ६१ हजार ६०० रुपयाचा दंड

Next
ठळक मुद्देरामदास डोमा नागफासे(बिरसोला)यांचा क्रमांक नसलेला सोनालिका कंपनीचा ट्रक्टरमध्ये १ ब्रास रेती विना रायॅल्टी नेत असताना पकडले. जकुमार दंदरे बिरसोला यांच्या एमएच ३५ जी.७२२७,ट्राली एमएच ३५ ९१०९ ट्रक्टरमध्ये गिट्टी भरताना पकडण्यात आले.

गोंदिया -गोंदिया तालुक्यातील रावणवाडी मंडळअंतर्गत महसुल विभागाचे मंडळ अधिकारी डी.एच.पोरचट्टीवार,तिवारी,लिपिक आशिष रामटेके  यांच्या पथकाने ६ फेबुवारीला अवैधरित्या रेतीची वाहतुक करतांना संतोष पुरणलाल पटले य(कोचेवाही)यांच्या ट्रक्टरक्रमांक एमएच ३५,जी. ४७५२ व ट्राली क्रमांक एमएच ३५ एफ ३६९७ मध्ये १ ब्रास रेती वाहतुक करतांना पकडण्यात आले.रामदास डोमा नागफासे(बिरसोला)यांचा क्रमांक नसलेला सोनालिका कंपनीचा ट्रक्टरमध्ये १ ब्रास रेती विना रायॅल्टी नेत असताना पकडले. राजकुमार दंदरे बिरसोला यांच्या एमएच ३५ जी.७२२७,ट्राली एमएच ३५ ९१०९ ट्रक्टरमध्ये गिट्टी भरताना पकडण्यात आले. कन्हारटोला येथील दीपक नागपूरे यांच्या एमएच ३५,जी.८३५३ व ट्राली एमएच ३५ एफ २२१९ मध्ये १ ब्रास रेतीची वाहतुक करताना पकडण्यात आले. या सर्वांना तहसीलदार राहुल सारंग यांनी याप्रकरणात प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.
त्याचप्रमाणे वडेगाव(बनाथर)येथील पुनर्वसन परिसरात सुमारे १०० ब्रास रेतीसाठी आढळून आल्याने तो जप्त करुन पोलीस पाटील आशिसिंग चव्हाण यांच्या सुपुर्तनाम्यावर देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे सदर रेती महसुल अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोचती करण्याचे निर्देश दिले आहे.

Web Title: 100 brass caught illegal sandstorm; 4 lakh 61 thousand 600 rupees penalty for tractor mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.