वैजापूर न.प.साठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:02 AM2018-04-06T00:02:36+5:302018-04-06T00:03:17+5:30

: येथील नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी गुरुवारी रात्री दहा वाजता थांबल्या. गुरुवारी रात्री दहापर्यंत प्रचाराची मुभा असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

 Voting today for Vaijapur NP | वैजापूर न.प.साठी आज मतदान

वैजापूर न.प.साठी आज मतदान

googlenewsNext

वैजापूर : येथील नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी गुरुवारी रात्री दहा वाजता थांबल्या. गुरुवारी रात्री दहापर्यंत प्रचाराची मुभा असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
नगर पालिकेच्या ११ प्रभागांतील २३ नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (दि.६) मतदान होत आहे. मतदानाच्या आठ तासांपूर्वी प्रचार बंद करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश असल्याने गुरुवारी रात्री दहा वाजता राजकीय पक्षांचा प्रचार संपुष्टात आला. नगर पालिका निवडणुकीत यंदा भाजप व शिवसेनेच्या वतीने सर्वाधिक उमेदवार उभे केल्याने या दोन्ही पक्षातच मतदानासाठी चढाओढ दिसणार आहे. शिवसेनेने २३ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. भाजपने १९ तर राष्ट्रवादीने ४ उमेदवार उभे केले. काँग्रेसतर्फे १ उमेदवार पंजा निशानीवर स्वार झालेले आहे. एम.आय.एम. पक्षासह अपक्ष एकूण ५४ उमेदवार नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात असून त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत प्रचार केला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. त्या तुलनेत काँग्रेसकडून मोठ्या नेत्यांची एकही सभा झाली नाही. राष्ट्रवादीकडून आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याच सभेची आठवण वैजापूरकरांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे व खासदार चंद्रकांत खैरे यांनीही प्रत्येक सभेतून भाजपवर तोंडसुख घेतले. गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही सायंकाळी डेपो रस्त्यावर शिवसेनेची सभा झाली. एम.आय.एम, काँग्रेसच्या सभांना नेतेच आले नाहीत. गेली पंधरा दिवस भोंगे, उमेदवारांच्या प्रचारगीतांनी प्रत्येक वस्तीत प्रचार कल्लोळ दिसून आला. गुरुवारी रात्री या भोंग्यांवर, प्रचारगीतांवर बंधने आली.
वाजतगाजत प्रचार थांबला
वैजापूर शहरात प्रचार संपण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात, दुचाकीवरून सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारफेऱ्या काढल्या. प्रत्येक गल्लीबोळात दिवसभर कार्यकर्ते मतांचा जोगवा मागत फिरत होते. दुसरीकडे मतदान शांततेत व्हावे, यासाठी प्रशासकीय तयारीला वेग देण्यात आला. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार सुमन मोरे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी मतदान प्रक्रियेतील संवेदनशीलतेचा आढावा घेतला. दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी रोख स्वरुपात रकमा पकडण्यात आल्या.

Web Title:  Voting today for Vaijapur NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.