अवघी वैजापूरनगरी साईचरणी लीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:31 AM2018-02-23T00:31:05+5:302018-02-23T00:32:19+5:30

दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील १५ हजार साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदवत गेल्या नऊ वर्षांचा विक्रम मोडला. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू आला. शहरातील १५ हजार भाविक शिर्डीत असल्यामुळे गुरुवारी वैजापूरनगरीत शुकशुकाट जाणवला.

 Vaijaparanangarai sarikaranam lena! | अवघी वैजापूरनगरी साईचरणी लीन!

अवघी वैजापूरनगरी साईचरणी लीन!

googlenewsNext

मोबीन खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील १५ हजार साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदवत गेल्या नऊ वर्षांचा विक्रम मोडला. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू आला. शहरातील १५ हजार भाविक शिर्डीत असल्यामुळे गुरुवारी वैजापूरनगरीत शुकशुकाट जाणवला.
सार्इंच्या गजरात तल्लीन झालेल्या वैजापूरकरांमुळे शहराला शिर्डीची शोभा आली होती. वृक्षलागवड, स्वच्छता, पर्यावरण असे विविध विषय हाती घेऊन वारकरी संप्रदायासोबत माळकरी आणि टाळकरी विद्यार्थीही दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, नयनरम्य पालखी सोहळ्याने वैजापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
टाळ-मृदंगामुळे वातावरणात साईंचाच गजर ऐकू येत होता. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वारकºयांच्या सेवेसाठी रस्त्यावर स्टॉल लावले होते. पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली.
यावेळी माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष विशाल संचेती, कैलास साखरे, योगिता साखरे, राजेंद्र लालसरे, रेवती लालसरे, आशाबाई आगळे, प्रशांत गायकवाड, नितीन लुनावत, शुभम् लालसरे, मनोज दौडे व सुधीर लालसरे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली.
नागपूर-मुंबई महामार्गावरील आठ तासांच्या प्रवासादरम्यान वैजापूर पालिका, साईभक्त, महादेव मित्र मंडळ व इतर संस्थांच्या वतीने दिंडीतील भाविकांसाठी चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी एक वाजता दिंडी शिर्डीत पोहोचल्यानंतर या भाविकांसाठी साई संस्थानने दर्शनाची व्यवस्था केली होती.
च्पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली. तब्बल ४२ कि.मी. अंतर आठ ते नऊ तासात पूर्ण करण्यात आले. पालखी वैजापुरातून जाणार म्हणून रस्ते झाडून पुसून स्वच्छ केले होते. पालखी मार्गावर सडासारवण-रांगोळ्या काढल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. बेलगाव, सटाणा, कोपरगावमार्गे दुपारी एक वाजता साईभक्त शिर्डीला पोहोचले.
कोट्यवधींची उलाढाल थांबली
गुरुवारी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था, छोट्या दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ जवळपास बंद असल्याचे दिसले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली. विशेष म्हणजे व्यापाºयांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवून पायी दिंडीत सहभाग नोंदविला.
नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागर
च्पायी दिंडीत दहा वर्षांपासून ते सत्तर वर्षे वयोगटातील भाविक सहभागी झाले होते. कुणी गप्पा टप्पा करत तर कुणी भजन म्हणत, काही तर मौन पाळत भक्तिभावाने निघाले. नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागर दिसला.
अर्धे भाविक अनवाणी
च्अर्ध्यापेक्षा जास्त भक्त अनवाणी पायाने चालत होते. जमीन भरपूर तापलेली पण थंड वारा मन उल्हासित करत होता. डोक्यामध्ये साईचरणाचेच विचारचक्र चालू झाले होते.
च्सारे जण सार्इंच्या दर्शनासाठी आतूर झाले होते. रस्त्यात ठिकठिकाणी खिचडी, पोहे, आईस्क्रीम, उसाचा रस, पाणी वाटप केले जात होते.

Web Title:  Vaijaparanangarai sarikaranam lena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.