पेन्शनपुऱ्यात अपक्षांचा वरचष्मा

By Admin | Published: January 9, 2015 12:41 AM2015-01-09T00:41:04+5:302015-01-09T00:52:54+5:30

औरंगाबाद : छावणीतील पेन्शनपुरा वॉर्डात यावेळी तब्बल ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे येथे खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत बघायला मिळत आहे.

In upper case of pension | पेन्शनपुऱ्यात अपक्षांचा वरचष्मा

पेन्शनपुऱ्यात अपक्षांचा वरचष्मा

googlenewsNext


औरंगाबाद : छावणीतील पेन्शनपुरा वॉर्डात यावेळी तब्बल ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे येथे खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत बघायला मिळत आहे. सेना, भाजपाचा प्रभाव कमी असल्यामुळे वॉर्डात अपक्षांचाच वरचष्मा दिसून येत आहे.
मागील वेळी अपक्ष उमेदवार शेख हनिफ हे या वॉर्डातून निवडून आले होते. यावेळी पुन्हा ते मैदानात आहेत. भाजपाने त्यांच्या विरोधात नंदकिशोर साकल यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून जीवन यादव हे मैदानात आहेत. गेल्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार राहिलेले सायना दारेल्लू हे यावेळी अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. तसेच लक्ष्मीनारायण श्रीगुरू, मोहम्मद नसीम, मोहम्मद अखिल, शेख खलील, युनूस खान हे पाच जण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या वॉर्डात शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा प्रभाव तुलनेने कमी आहे. त्यामुळे येथे अपक्ष उमेदवारांचीच चर्चा अधिक आहे. त्यातही विद्यमान नगरसेवक हनिफ शेख आणि मोहम्मद नसीम या दोघांमध्ये प्रमुख लढत होईल, असे दिसते. पेन्शनपुरा वॉर्डात एकूण १७१० मतदार आहेत. पेन्शनपुरा वॉर्डाचा अलीकडच्या काही वर्षांतील इतिहास पाहता येथे कोणत्याही नगरसेवकाला मतदारांनी सलग दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही. मात्र, यावेळी हे रेकॉर्ड आपण ब्रेक करू, असा दावा नगरसेवक शेख हनिफ करीत आहेत. दुसरीकडे सेना, भाजपा आणि इतर अपक्ष उमेदवार हे शेख हनिफ यांनी वॉर्डात विकासकामे केली नसल्याचे सांगून मतदारांकडे मते मागत आहेत. सेनेचे सायना दारेल्लू हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. छावणीत सध्या सातपैकी तीन वॉर्डात उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये पेन्शनपुरा वॉर्डाचाही समावेश आहे. सहा आणि दोन क्रमांकाच्या वॉर्डात प्रत्येकी दहा उमेदवार रिंगणात आहेत. तर पेन्शनपुरा वॉर्डात ही संख्या ९ आहे. प्रचारासाठी एकच दिवस राहिल्याने सर्व उमेदवार जोरदार प्रचार करीत आहेत. सकाळ, संध्याकाळ पदयात्रा काढण्यात येणार आहेत.

Web Title: In upper case of pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.