पानशेंद्र्यातील तेरा शेतक-यांनी दिली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:52 AM2017-11-17T00:52:58+5:302017-11-17T00:53:02+5:30

: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील पानशेंद्रा येथील तेरा शेतक-यांनी गुरुवारी आपली जमीन शासनाला विक्री केली.

 Thirteen farmers of Panashendra gave land | पानशेंद्र्यातील तेरा शेतक-यांनी दिली जमीन

पानशेंद्र्यातील तेरा शेतक-यांनी दिली जमीन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील पानशेंद्रा येथील तेरा शेतक-यांनी गुरुवारी आपली जमीन शासनाला विक्री केली. येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात थेट वाटाघाटीने ही खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
समृद्धीसाठी जमीन खरेदीच्या प्रक्रियेला जालना, बदनापूर तालुक्यात वेग येत असून, शहरालगत असलेल्या पानशेंद्रा व जामवाडी भागात जमिनीचा दर सर्वाधिक आहे. आता कमी क्षेत्र जात असलेल्या शेतक-यांनी जमीन देण्यास सहमती दर्शवली आहे. गुरुवारी १३ शेतक-यांनी आठ हेक्टर ३२ आर जमीन शासनाला विक्री केली. दोन दिवसांपूर्वी बदनापूर येथील १८ शेतक-यांनी समृद्धीसाठी जमीन दिली आहे. बदनापूर दुय्यम निबंधक कार्यालयात ही प्रक्रिया पूर्ण झाली. जमिनीचा मोबदला आरटीजीएसद्वारे थेट शेतकºयांच्या खात्यात जमा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Thirteen farmers of Panashendra gave land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.