पदवीधरांचा अल्प प्रतिसाद

By Admin | Published: June 20, 2014 11:48 PM2014-06-20T23:48:50+5:302014-06-21T00:50:24+5:30

परभणी: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एक प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविण्यासाठी २० जून रोजी जिल्ह्यात मतदान झाले.

Short graduation of graduates | पदवीधरांचा अल्प प्रतिसाद

पदवीधरांचा अल्प प्रतिसाद

googlenewsNext

परभणी: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एक प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविण्यासाठी २० जून रोजी जिल्ह्यात मतदान झाले. दिवसभरात केवळ ३४.९७ टक्के मतदान झाले आहे. परभणी जिल्ह्यात ३१ हजार ८०० मतदारांपैकी ११ हजार २७६ मतदारांनी मतदान केले. गेल्यावेळी जिल्ह्याची टक्केवारी ३२ टक्के होती.
पाथरी येथे ५६ टक्के मतदान
पाथरी तालुक्यामध्ये तीन मतदान केंद्र आहे. त्यात १५५४ पैकी ८७४ (५६.२४) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील हादगाव येथील मतदान केंद्रावर २०६ पैकी १४७ मतदान झाले. तर तहसील कार्यालयात असलेल्या दोन मतदान केंद्रावर ६७३ पैकी ४०९ आणि ६७५ पैकी ३१८ मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी, अनिल नखाते, मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टे़ंगसे, चक्रधर उगले, शंतनू पाटील, जुनैदखान दुर्राणी, तबरेज खान दुर्राणी आदी नेतेमंडळी उपस्थिती होती.
गंगाखेडमध्ये ३४ टक्के
गंगाखेड तालुक्यात पाच मतदार केंद्रावर ३४ टक्के मतदान झाले. २ हजार ९५० मतदारांपैकी १ हजार ७३ मतदारांनी हक्क बजावला. गंगाखेड शहरामध्ये तीन मतदान केंद्र होते. त्यापैकी पहिल्या मतदान केंद्रावर ७२४ पैकी २५८, दुसऱ्या मतदान केंद्रावर ७२५ पैकी २२१ तर तिसऱ्या मतदान केंद्रावर ७९७ पैकी २५८ मतदारांनी हक्क बजावला. माखणी येथील मतदान केंद्रावर ३२१ पैकी ८४ आणि राणीसावरगाव मतदान केंद्रावर ३७१ पैकी १७९ मतदान झाले.
पूर्णा तालुक्यात ४६ टक्के
तालुक्यात पाच मतदान केंद्र होते. या मतदान केंद्रावर २ हजार ४४९ मतदारांपैकी १ हजार १६५ मतदारांनी मतदान केले. ४६.५९ टक्के मतदान झाले. कात्नेश्वर येथील मतदान केंद्रावर २२२ पैकी १२० (५४ टक्के), ताडकळस २४५ पैकी १२३ (५० टक्के), चुडावा ३६९ पैकी २२३ म्हणजे ६० टक्के मतदान झाले. तर पूर्णा शहरातील दोन मतदान केंद्रावर १६६० पैकी ६९७ मतदान (४२ टक्के) झाले.
सेलूत ४७.५० टक्के मतदान
तालुक्यात ४७.५० टक्के मतदान झाले. तालुक्यात ४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. यात तहसील कार्यालयात २ व वालूर व चिकलठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रत्येकी १ केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. सेलू तालुक्यात २ हजार १६३ मतदार होते. यापैकी १ हजार २५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पालममध्ये दोन केंद्र
पालम तालुक्यात दोन मतदान केंद्रावर मतदान झाले. तहसीलच्या मतदान केंद्रावर ५५९ पैकी ३२६ (६० टक्के) तर चाटोरीच्या मतदान केंद्रावर ४३० पैकी २२४ (५३.४० टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मानवत ५६ टक्के
मानवत तालुक्यातील १ हजार ९७ मतदारांपैकी ५९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ५६.७५ एवढी आहे. केकरजवळा येथील मतदान केंद्रावर ९३ पैकी ५३ मतदारांनी मतदान केले. कोल्हा येथील केंद्रावर १२९ पैकी ७७ तर मानवत शहरातील मतदान केंद्रावर ५७५ पैकी ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बोरी येथील एका मतदान केंद्रावर ४०० पैकी २०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)
परभणी शहरात ३ हजार८३१ मतदान
परभणी शहरात ८ मतदान केंद्रांवर जवळपास १७ हजारांपैकी ३ हजार ८३१ मतदान झाले.शिवाजी कॉलेज केंद्रावर २३८८ पैकी ६३४, क्रीडाधिकारी कार्यालय १७१३ पैकी ३६३, नूतन विद्यालय १८०० पैकी ६०३, संत तुकाराम विद्यालय १९०८ पैकी ३७१, कडा आॅफिस २३०० पैकी ६५०, डॉ.आंबेडकर भवन १८५३ पैकी ४३८, जि.प.कन्या प्रशाला २१०६ पैकी ४९२ तर बाल विद्यामंदिर केंद्रावर १४०० पैकी २८० असे एकूण ३ हजार ८३१ मतदान झाले. झरीत ९२, पिंगळी ७५, पेडगाव ७९, सिंगणापूर २५, दैठणा येथे ९१ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Short graduation of graduates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.