घरपट्टी वाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:23 AM2017-08-22T00:23:57+5:302017-08-22T00:23:57+5:30

शहरातील नागरिकांना महानगरपालिका ११ पटीने घरपट्टी वाढवून त्यांना तशा नोटिसा देवून दहशत निर्माण करीत आहे़ महानगरपालिकेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही़ शिवसेनेने आतापर्यंत मनपाला सुधारण्याची संधी दिली होती़ परंतु, सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांमधील दरवाढीची दहशत कमी होत नाही़ त्यामुळे शिवसेनाच आता जनतेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली़

Shivsena will be on the street against the house tax hike | घरपट्टी वाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

घरपट्टी वाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नागरिकांना महानगरपालिका ११ पटीने घरपट्टी वाढवून त्यांना तशा नोटिसा देवून दहशत निर्माण करीत आहे़ महानगरपालिकेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही़ शिवसेनेने आतापर्यंत मनपाला सुधारण्याची संधी दिली होती़ परंतु, सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांमधील दरवाढीची दहशत कमी होत नाही़ त्यामुळे शिवसेनाच आता जनतेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली़
परभणी येथे आ़ राहुल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली़ यावेळी बोलताना ते म्हणाले की, महानगरपालिकेने नागरिकांना घरपट्टी वाढी संदर्भात नोटिसा दिल्या आहेत़ त्यामध्ये घरपट्टी वाढीचे दर ११पटीने वाढविले आहेत़ परिणामी स्वत:च्याच घरात राहणाºया नागरिकांना या दरवाढीमुळे किरायाच्या घरात राहतो की काय अशी भीती वाटू लागली आहे़ मनपाकडून शहरात एका महिन्यात केवळ तीन वेळा पाणीपुरवठा केला जातो़ स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे़ शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून न देता सत्ताधाºयांच्या तुमड्या भरण्यासाठी नागरिकांकडून घरपट्टीच्या नावाखाली कर वसुली केली जात आहे़ सर्वसामान्यांना त्रास देवून व दहशत पसरवून वसूल केल्या जाणाºया घरपट्टीला शिवसेनेचा कडाडून विरोध आहे़ यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल़ शिवाय शासनाकडे याबाबत दाद मागू़ वेळप्रसंगी न्यायालयातही धाव घेतली जाईल, असा इशाराही यावेळी आ़पाटील यांनी दिला़ शासनाने २००८ पर्यंत विना परवाना झालेली बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला असतानाही मनपा गेल्या २५ वर्षांपासूनची घरपट्टी दंडासह वसूल करण्याचा तगादा लावत आहे़ त्यामुळे मनपाने दिलेली नोटीसच गैरकायदेशीर असून, ती रद्द झाली पाहिजे, असेही आ़ पाटील म्हणाले़ यासाठी जनतेमध्ये जाऊन जनजागृती करणार असून, यापुढील काळात शिवसेना स्टाईलने शहरात आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला़ शहरात अतिक्रमण हटवितानाही मनपाकडून पक्षपाती धोरण अवलंबिले जात असल्याचे ते म्हणाले़ शिवसेनेकडून आगामी काळात महारोजगार मेळावा घेतला जाणार असून, महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे़ शिवाय सामूहिक विवाह सोहळ्याचेही फेब्रुवारी महिन्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे, सदाशिव देशमुख, संजय घाडगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Shivsena will be on the street against the house tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.