मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ऋषिकेश कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:07 PM2018-09-29T23:07:33+5:302018-09-29T23:10:11+5:30

औरंगाबाद : उदगीर येथे होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक, कवी डॉ. ऋषिकेश कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक परभणी येथे प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ही निवड करण्यात आली.

Rishikesh Kamble is the president of Marathwada Sahitya Sammelan | मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ऋषिकेश कांबळे

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ऋषिकेश कांबळे

googlenewsNext

औरंगाबाद : उदगीर येथे होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक, कवी डॉ. ऋषिकेश कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक परभणी येथे प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ही निवड करण्यात आली.
डॉ. कांबळे यांनी यापूर्वी दलित- ग्रामीण- आदिवासी साहित्य संमेलन, पुरोगामी साहित्य संमेलन, बहुजनवादी ग्रामीण साहित्य संमेलन, फुले- आंबेडकरी साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन, मराठवाडा युवा साहित्य संमेलन आदींची अध्यक्षपदे भूषविली आहेत. मराठवाडा साहित्य संमेलनाचे दलित प्रवाहातील प्र. ई. सोनकांबळे, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. दत्ता भगत हे अध्यक्ष राहिले आहेत. या प्रवाहातील डॉ. कांबळे हे चौथे अध्यक्ष आहेत.
या बैठकीला कार्यवाह डॉ. दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सगर, के. एस. अतकरे, डॉ. शेषराव मोहिते, डॉ. सतीश साळुंखे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. जगदीश कदम, डॉ. सुरेश सावंत, प्रा. सुरेश जाधव, नितीन तावडे, संतोष तांबे, विलास सिदगीकर, देवीदास फुलारी, प्रा. विलास वैद्य, डॉ. आसाराम लोमटे, डॉ. संजीवनी तडेगावकर, प्रा. रसिका देशमुख, जीवन कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
------------

Web Title: Rishikesh Kamble is the president of Marathwada Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.