२२३ ग्रामपंचायतींसाठी ७१२ केंद्रांवर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:42 AM2017-10-06T00:42:01+5:302017-10-06T00:42:01+5:30

२२३ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी ७१२ केंद्रांवर मतदान होणार आहे.

Polling for 722 centers for 223 Gram Panchayats | २२३ ग्रामपंचायतींसाठी ७१२ केंद्रांवर मतदान

२२३ ग्रामपंचायतींसाठी ७१२ केंद्रांवर मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यात निवडणूक होणा-या २३२ पैकी नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, २२३ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी ७१२ केंद्रांवर मतदान होणार आहे. सरंपचपदाच्या २२३ जागांसाठी ६८८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी प्रचाराची मुदत संपल्यामुळे उमेदवारांकडे प्रत्यक्ष गाठीभेटीसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे.
जालना तालुक्यातील २९ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर २० ग्रामपंचायतींसाठी सरंपच पदाचे १०५ तर सदस्यपदाच्या २४५ जागांसाठी ४१७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भोकरदन तालुक्यातील ३२ पैकी तीन ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या आहेत. सदस्य पदाच्या२६२ सदस्य जागांसाठी ४९२ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंंगणात आहेत. जाफराबाद तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे ३५ तर सदस्य पदाचे २०८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बदनापूरमधील चौदा पैकी १ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सदस्य पदाच्या ११२ जागांसाठी १८२ तर सरपंचपदासाठी ४९ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत. मंठा तालुक्यामध्ये एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली

Web Title: Polling for 722 centers for 223 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.