अंबाजोगाईत लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:08 AM2017-10-11T00:08:10+5:302017-10-11T00:08:10+5:30

बीडमध्ये नुकत्याच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अंबाजोगाईतील लॉजवर छापा टाकून पुन्हा एका कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले

Police expose prostitution lodge in Ambojogai | अंबाजोगाईत लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश

अंबाजोगाईत लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीडमध्ये नुकत्याच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अंबाजोगाईतील लॉजवर छापा टाकून पुन्हा एका कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले . चक्क बसस्थानकासमोरच अड्डा चालविणाºयासह ग्राहक व एका विवाहितेला पोलिसांनी जेरबंद केले . या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
लॉज चालक पांडूरंग पापालालजी लखेरा (मंगळवारपेठ, अंबाजोगाई), मालक लक्ष्मणदास वैष्णव व एका ग्राहकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून चक्क बसस्थानकासमोरच हा वेश्या व्यवसाय खुलेआम चालत असल्याची माहिती बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख पोउपनि दीपाली गित्ते यांना मिळाली. त्यांनी याची खात्री करून घेतली. त्यानंतर सकाळी सात वाजेपासूनच त्यांनी बसस्थानक परिसरात सापळा लावला. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अनुराधा गुरव प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होत्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास खात्री पटताच गुरव यांच्या आदेशानुसार छापा टाकला.
या कारवाईत चालक व एका ग्राहकासह ३० वर्षीय विवाहितेला ताब्यात घेण्यात आले. बीडच्या पथकाने केलेल्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे, पोनि घनश्याम पाळवदे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.उपअधीक्षक अनुराधा गुरव, अ.मा.वा.प्र.कक्षाच्या प्रमुख पोउपनि दीपाली गित्ते, अप्पासाहेब सानप, शेख शमिम पाशा, दामिनी पथकाच्या कांता सोनवणे, मिरा रेडेकर, निशा घुले, शेख मोहसीन, अंबाजोगाईचे पोउपनि वाघमारे ,बोडखे यांनी केली.

Web Title: Police expose prostitution lodge in Ambojogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.