औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात स्फोटाच्या अफवेने रुग्ण व नातेवाईकांची पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 02:02 PM2017-12-09T14:02:47+5:302017-12-09T14:04:11+5:30

शासकीय रुग्णालय घाटी येथे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये दुपारी आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला. या आवाजास स्फोट झाल्याचे समजून नातेवाईकांनी रुग्णांना घेऊन पळ काढला.

The patients and relatives run away from government hospital in Aurangabad due to threat of blast | औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात स्फोटाच्या अफवेने रुग्ण व नातेवाईकांची पळापळ

औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात स्फोटाच्या अफवेने रुग्ण व नातेवाईकांची पळापळ

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय घाटी येथे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये दुपारी आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला. या आवाजास स्फोट झाल्याचे समजून नातेवाईकांनी रुग्णांना घेऊन पळ काढला. यामुळे रुग्णालयात एकच गोंधल उडाला. या घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांनी वॉर्डात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

याविषयी अधिक माहिती अशी, घाटीतील वॉर्ड क्रमांक २४ मध्ये एका रुग्णाच्या व्हेटिंलेटरचे आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला. हा अवाज ऐकून एका नातेवाईकाने स्फोट होत असल्याच्या भितीने रुग्णाला घेऊन वॉर्डाबाहेर पळ काढला. हे पाहून इतर नातेवाईकांनीही रुग्णांना घेऊन वॉर्डाबाहेर धाव घेतली. त्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. याविषयी माहिती मिळताच डॉक्टर, सुरक्षारक्षकांनी या वॉर्डात धाव घेतली. स्फोटवैगरे काहीही नसल्याची बाब त्यांनी नातेवाईकांना सांगितली. रुग्ण,नातेवाईक पुन्हा वॉर्डात दाखल झाले.

Web Title: The patients and relatives run away from government hospital in Aurangabad due to threat of blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.