क्रीडा महोत्सवाचे ३१ मार्चपासून आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:52 PM2018-03-29T23:52:53+5:302018-03-29T23:53:42+5:30

क्रीडा भारतीतर्फे पारंपरिक खेळांना चालना मिळावी या हेतूने ३१ मार्चपासून विविध खेळांच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मल्लखांब, कबड्डी, गदायुद्ध, रस्सीखेच, जलतरण व ज्युदो खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत.

Organizing the sports festival from March 31 | क्रीडा महोत्सवाचे ३१ मार्चपासून आयोजन

क्रीडा महोत्सवाचे ३१ मार्चपासून आयोजन

googlenewsNext

औरंगाबाद : क्रीडा भारतीतर्फे पारंपरिक खेळांना चालना मिळावी या हेतूने ३१ मार्चपासून विविध खेळांच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मल्लखांब, कबड्डी, गदायुद्ध, रस्सीखेच, जलतरण व ज्युदो खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत. मल्लखांब स्पर्धा एन- ५ येथे, कबड्डी दगडूजी देशमुख महाविद्यालय येथे, गदायुद्ध भगवानबाबा मंगल कार्यालय येथे, रस्सीखेच पोलीस पब्लिक स्कूल येथे तर जलतरण स्पर्धा मनपाच्या सिद्धार्थ स्विमिंगपूल येथे होणार आहे. ज्युदोच्या स्पर्धा सहकारनगर येथील मनपा सभागृहात होणार आहे. या सर्व खेळासाठी मोफत प्रवेश असणार आहे. अधिक माहितीसाठी विनायक राऊत (मल्लखांब), आकाश जाधव (कबड्डी), गदायुद्ध (मच्छिंद्र राठोड), संदीप जाधव (रस्सीखेच), अभय देशमुख (जलतरण), विश्वास जोशी (ज्युदो) यांच्याशी संपर्क साधावा. क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन औरंगाबाद क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, विजयराव खाचणे, सुभाष शेळके, मीनाक्षी मुलियार, शिवाजी जोशी, केदार राहणे, विजय राठी आदींनी केले आहे.

Web Title: Organizing the sports festival from March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :