संकेतस्थळावर चार वर्षापूर्वीचेच अभिलेखे

By Admin | Published: May 26, 2017 11:12 PM2017-05-26T23:12:17+5:302017-05-26T23:22:34+5:30

बीड : संकेतस्थळावर चार वर्षांपूर्वीचेच अभिलेखे अजूनही शेतकऱ्यांना पाहावे लागतात

Only four years ago, on the website, | संकेतस्थळावर चार वर्षापूर्वीचेच अभिलेखे

संकेतस्थळावर चार वर्षापूर्वीचेच अभिलेखे

googlenewsNext

अविनाश मुडेगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे महसुली अभिलेखे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ७/१२ पाहण्याची सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या संकेतस्थळावर चार वर्षांपूर्वीचेच अभिलेखे अजूनही शेतकऱ्यांना पाहावे लागतात. हे संकेतस्थळ अद्ययावत न झाल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे महसुली अभिलेखे व शेतजमिनीचा झालेला खरेदी-विक्रीचा व्यवहार पाहण्याची सुविधा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. यासाठी संकेतस्थळावर एनआयसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ७/१२ पाहण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ स्थापन करण्यात आले आहे. महसुली कायद्यानुसार राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो. प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आपल्या ७/१२ सह शेतीबाबतच्या विविध सुविधा या माध्यमातून पाहत असतात. मात्र, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे संकेतस्थळ अद्ययावत नसल्याने याचा मोठा फटका सहन करावा लागतो. तहसील कार्यालय व इतरत्र खेटे घालण्याची शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध झाली; परंतु बीड जिल्ह्यात या संकेतस्थळावर १ मार्च २०१३ पर्यंतचेच ७/१२ व शेतजमिनीच्या व्यवहारासंबंधीच्या नोंदी उपलब्ध आहेत.
४ वर्षांनंतरही महसूल प्रशासनाच्या वतीने हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात न आल्याने जिल्ह्याबाहेरील शेतकरी व किसानपुत्रांना याचा लाभ घेता येत नाही.
हे संकेतस्थळ अद्ययावत करा, अशी मागणी पाटोदा येथील शेतकरी सिद्धेश्वर स्वामी यांनी एका निवेदनाद्वारे अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे केली आहे.

Web Title: Only four years ago, on the website,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.