प्रवासी वाढले तरच औरंगाबाद शहराला विमान ‘कनेक्टिव्हिटी’ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:58 PM2018-07-16T23:58:35+5:302018-07-17T00:01:17+5:30

येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरणावर ११० कोटी रुपये खर्च करून ९ वर्षे होत आले असून, या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणे शक्य होण्यात प्रवासी संख्या वाढण्याचा अडथळा आहे. औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद जगाच्या नकाशावर असले तरी पर्यटकांच्या संख्येचे प्रमाण वाढत नाही, तर दुसरीकडे औद्योगिक गुंतवणुकीला मोठी भरारी मिळत नाही. त्यामुळे नॅशनल, इंटरनॅशनल एअर कनेक्टिव्हिटीपासून हे विमानतळ सध्या दूरच आहे.

Only after the passenger gets increased, the 'connectivity' of the city to Aurangabad speed | प्रवासी वाढले तरच औरंगाबाद शहराला विमान ‘कनेक्टिव्हिटी’ गतीने

प्रवासी वाढले तरच औरंगाबाद शहराला विमान ‘कनेक्टिव्हिटी’ गतीने

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय विमाने उडणे शक्य : विदेशी पर्यटकांचे प्रमाणही झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरणावर ११० कोटी रुपये खर्च करून ९ वर्षे होत आले असून, या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणे शक्य होण्यात प्रवासी संख्या वाढण्याचा अडथळा आहे. औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद जगाच्या नकाशावर असले तरी पर्यटकांच्या संख्येचे प्रमाण वाढत नाही, तर दुसरीकडे औद्योगिक गुंतवणुकीला मोठी भरारी मिळत नाही. त्यामुळे नॅशनल, इंटरनॅशनल एअर कनेक्टिव्हिटीपासून हे विमानतळ सध्या दूरच आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद येथून विमानसेवा व्यापक करण्याच्या दृष्टीने विमानसेवा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत औरंगाबादच्या क्षमतांचे मार्के टिंग करण्यात आल्याने विमान कंपन्या आणि केंद्र शासन आंतरराष्ट्रीय विमानसेवा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.
बुद्धिस्ट सर्किटमध्ये कोलंबो ते औरंगाबाद सुरू करण्यास श्रीलंका एअरवेजला काहीच अडचण नाही. बोधगया ते औरंगाबादमार्गे थायलंड ते क्वालालंपूर ते आॅस्ट्रेलिया कनेक्टिव्हिटी होईल. कमी खर्च व वेळेत ही सगळी कनेक्टिव्हिटी होईल. चेन्नई, बंगलोर, निमराणा, जयपूर, ढोलेरो हे आॅटो हब कनेक्ट करा, उत्तर दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशी विमान सेवेची कनेक्टिव्हिटी आगामी काळात व्हावी, यावर बैठकीत चर्चा झाली.
सध्या येथील विमानतळावर पूर्ण सुविधा आहेत. कार्गाेसंदर्भात तीन वर्षांपासून फॉलोअप सुरू आहे. कार्गाे टर्मिनलसाठी तीन दिवसांपूर्वी मशीन बसविण्यात आली आहे. कार्गाे सेवा लवकरच सुरू होईल.
लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा
रात्री पार्किंग येथे झाले तर त्याचे फायदे होतील. मुंबई, पुण्यानंतर येथे येताना औरंगाबादचे प्रवासी मिळतील. येथून जाताना लवकर विमान मिळेल. शेतकऱ्यांची मागणी होती, उडाण योजनेमध्ये औरंगाबाद सहभागी करून घ्या. तीन विमानांपेक्षा जास्त विमाने असतील तर तेथे उडाण योजना देता येत नाही.
आंतरराष्ट्रीय विमाने लवकरच सुरू होतील. कारण केंद्र शासनाने उड्डाण होताना जो तोटा होईल, त्याचे अनुदान देण्याबाबत तरतूद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमाने येथून जाण्याची शक्यता आहे. टीअर टू सिटीजमध्ये औरंगाबाद हा चांगला पर्याय आहे. आयकॉनिक स्ट्रक्चर म्हणून अजिंठा-वेरूळ लेण्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शासन आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत स्वत:च घोषणा करणे शक्य होईल, असे सीएमआयए अध्यक्ष भोगले यांनी सांगितले.

Web Title: Only after the passenger gets increased, the 'connectivity' of the city to Aurangabad speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.