आता फुकटात टँकरचे पाणी बंद

By Admin | Published: September 24, 2014 12:59 AM2014-09-24T00:59:11+5:302014-09-24T01:06:51+5:30

औरंगाबाद : ‘कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद में अमृत पिलाने से क्या फायदा...’ या दोन ओळी अनेकांच्या मोबाईलच्या सिंगटोन, रिंगटोन आहेत.

Now stop the water of the tanker | आता फुकटात टँकरचे पाणी बंद

आता फुकटात टँकरचे पाणी बंद

googlenewsNext

औरंगाबाद : ‘कभी प्यासे को पानी पिलाया नहीं
बाद में अमृत पिलाने से क्या फायदा...’ या दोन ओळी अनेकांच्या मोबाईलच्या सिंगटोन, रिंगटोन आहेत. शिवाय अनेक घरांमध्ये पहाटे एक भजन म्हणूनदेखील या ओळी कानी पडतात; परंतु आता या ओळींचा अर्थ महापालिकेच्या खाजगीकरणामुळे पूर्णत: बदलला आहे.
शहरातील कोणत्याही तहानलेल्या व्यक्तीला फुकटात पाणी मिळणार नाही. ‘अन्नदान व पाण्याचा धर्म करा,’ असे पूर्वजांनी सांगितले होते. मात्र, बदलत्या जगामध्ये पाणी विकण्याची परंपरा मनपाने सुरू केली आहे. समाजसेवा म्हणून मोफत पाणी देण्याची संकल्पनाही बंद झाली असून, आता पैसे द्या आणि पाणी घ्या, असे समीकरण तयार झाले आहे.
समांतर जलवाहिनीचे काम खाजगीकरणातून (पीपीपी मॉडेल) सुरू झाले आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे ७९२ कोटी रुपयांच्या त्या योजनेचे काम देण्यात आले आहे.
४०० कोटी रुपये केंद्र व राज्य शासन आणि ४०० कोटी रुपये मनपाचा वाटा या योजनेत आहे. मनपाकडे ४०० कोटी नाहीत. त्यामुळे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज काढून योजनेत गुंतविणार आहे. त्यापोटी पालिका २० वर्षांपर्यंत कंपनीला दरवर्षी ६३ कोटी रुपये देणार आहे.

Web Title: Now stop the water of the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.