‘त्या स्पा’ मध्ये अनेकांनी केली मसाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:15 AM2017-12-11T00:15:18+5:302017-12-11T00:16:21+5:30

प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हब या दोन्ही स्पामध्ये रोज सरासरी ५० ते ६० जण मसाज करण्यासाठी जात होते. या ग्राहकांकडून स्पाच्या मालकाला मिळणारा गल्ला आठ ते दहा लाखांच्या घरात असे.

 Massage made by many in 'The Spa' | ‘त्या स्पा’ मध्ये अनेकांनी केली मसाज

‘त्या स्पा’ मध्ये अनेकांनी केली मसाज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हब या दोन्ही स्पामध्ये रोज सरासरी ५० ते ६० जण मसाज करण्यासाठी जात होते. या ग्राहकांकडून स्पाच्या मालकाला मिळणारा गल्ला आठ ते दहा लाखांच्या घरात असे. विशेष म्हणजे स्पामध्ये मसाज करणाºया मुली बदलून आल्या की, ग्राहकांना माहिती कळविली जात असे.
प्रोझोनमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हब या दोन स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाºया आंतरराष्ट्रीय सेक्स रॅके टचा गुरुवारी पोलीसांनी पर्दाफाश केला. तेथे काम करण्यासाठी आणण्यात आलेल्या थायलंडमधील ९ मुलींची पोलिसांनी मुक्तता केली.
३ ग्राहक आणि व्यवस्थापक आणि अन्य कर्मचारी सध्या पोलीस कोठडीत आहेत. तेथे काम करीत असलेल्या स्थानिक दोन मुली दीड महिन्यापूर्वीच रुजू झाल्या होत्या. त्यांना आत काय चालते, याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. विदेशी मुली कशा आल्या याविषयी व्यवस्थापक शशांक खन्ना हा पोलिसांना उडवाउडवीची माहिती देत आहे.
आंतरराष्ट्रीय दलालांमार्फत मुली यायच्या भारतात
जगभरात सेक्स रॅकेटचा व्यवसाय जोमात आहे. या रॅकेटमध्ये काम करणारे दलाल विविध देशांतील विविध शहरांत आहेत. ते मागणीनुसार मुली उपलब्ध करीत असतात. औरंगाबादेतील स्पामध्ये ९ थाई मुलींही त्यांच्यामार्फतच आल्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे. टुरिस्ट व्हिसा घेऊन त्या भारतात आल्याने त्यांच्यावर कोणताही संशय पोलिसांना येत नाही. विशेषत: डिसेंबर महिन्यात ख्रिसमसनिमित्त विदेशी पर्यटक भारतात अधिक येतात. गोवा, मुंबई, दिल्ली, बेंगलोरसह प्रमुख शहरांत त्या जातात. मात्र यातील काही पर्यटक केवळ सेक्स रॅकेटचाच भाग असतात.

Web Title:  Massage made by many in 'The Spa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.