मराठवाडा विद्यापीठ पदवीधर मतमोजणी धीम्या गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:21 AM2017-12-08T00:21:45+5:302017-12-08T00:21:49+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गटाच्या मतमोजणी प्रक्रियेला गुरुवारी सकाळी १० वाजता सुुरुवात झाली. रात्री १२ वाजेच्या सुमारास पहिला निकाल हाती आला.

Marathwada University Graduation Countdown Slowly | मराठवाडा विद्यापीठ पदवीधर मतमोजणी धीम्या गतीने

मराठवाडा विद्यापीठ पदवीधर मतमोजणी धीम्या गतीने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गटाच्या मतमोजणी प्रक्रियेला गुरुवारी सकाळी १० वाजता सुुरुवात झाली. रात्री १२ वाजेच्या सुमारास पहिला निकाल हाती आला. यामध्ये उत्कर्ष पॅनलचे उमेदवार प्रा. सुनील मगरे ७४१९ मतांनी विजयी झाले. त्यांना ९६०१ मते मिळाली.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर चार जिल्ह्यांतील मतपत्रिका संवर्गनिहाय वेगळ्या करण्यासच सायंकाळचे सहा वाजले होते. यानंतर साडेसहा वाजता अनुसूचित जाती संवर्गातील पात्र-अपात्र मते मोजण्यास सुुरुवात केली. एकूण सर्व जागांचे निकाल शुक्रवारी लागतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी व्यक्त केली.
विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गटातील १० जागांसाठी सोमवारी (दि.४) चार जिल्ह्यांतील ५६ केंद्रांवर मतदान झाले. या मतांची मतमोजणी गुुरुवारी सकाळी दहा वाजता क्रीडा विभागाच्या सभागृहात सुुरू झाली. विद्यापीठ प्रशासनाने मागील टप्प्यातील गोंधळ लक्षात घेता यावेळी तयारीनिशी मतमोजणीला सुरुवात केली. मतमोजणीसाठी तीन शिफ्टमध्ये कर्मचाºयांच्या नेमणुका केल्या. १६ हजार ८८५ मतांची वर्गवारी संवर्गनिहाय करणे आणि सर्व मतपत्रिका एकत्रित करीत २५, ५० आणि १०० गठ्ठे तयार करण्यातच सायंकाळचे सहा वाजून गेले. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर अनुसूचित जाती गटातील पात्र आणि अपात्र मतांची मोजणी सुरू केली होती. या गटाचे निकाल लागल्यानंतर अनुसूचित जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, महिला राखीव आणि सर्वांत शेवटी खुल्या प्रवर्गातील मतमोजणी होणार आहे.

...बघा काही करता येते का?
मतपत्रिका संवर्गनिहाय वेगळ्या करण्याचे काम सुुरू होते. तेव्हा एका मतपत्रिकेच्या एका गठ्ठ्यामध्ये मतदाराने उमेदवारांसाठी पत्र टाक ल्याचे दिसून आले. या पत्रातील मजकूर मतदाराच्या शब्दांत जशाच तसा पुढीलप्रमाणे : ‘आज रोजी ग्रॅज्युएट असलेला मुलगा उमेदवाराचे लग्न करताना कायमस्वरूपी नोकरी नसल्याने अडचणी येतातच.
मुलगी म्हणजे जॉब सेक्युअर पाहिजे. हा मुद्दा निवडणुकीचा जरी नसला तरी जीवनाकरिता महत्त्वाचा आहे. अनेक मुला/मुलींची लग्ने न झाल्याने वय ३५/४० झाले आहे, तरी कायम व फिक्स पे का होईना, जॉब मिळाला पाहिजे. अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर्स, बीए, एमए, बीएस्सी, एमएस्सी, बीकॉम, एमकॉम बेकार आहेत. जॉब सेक्युर नाहीत. ...बघा काही करता येते का!’

Web Title: Marathwada University Graduation Countdown Slowly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.