पुढच्या जन्माच्या विचारापेक्षा देहदानातून याच जन्मात जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:29 PM2017-11-18T23:29:41+5:302017-11-18T23:29:45+5:30

रक्तदान, अवयवदानात वाढ होत आहे. परंतु रूढी-परंपरांमुळे देहदानात अडचणी येतात. आत्म्याला शांती मिळणार नाही, या भीतीवजा चिंतेने कुटुंबीय देहदान करीत नाहीत. माझ्या आईचे देहदान करतानाही हीच परिस्थिती होती. आईच्या संकल्पाविषयी नातेवाईकांना समजावल्यानंतर अखेर तिच्या इच्छेनुसार देहदान केले.

 Life in this life from the life of the next birth | पुढच्या जन्माच्या विचारापेक्षा देहदानातून याच जन्मात जगा

पुढच्या जन्माच्या विचारापेक्षा देहदानातून याच जन्मात जगा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रक्तदान, अवयवदानात वाढ होत आहे. परंतु रूढी-परंपरांमुळे देहदानात अडचणी येतात. आत्म्याला शांती मिळणार नाही, या भीतीवजा चिंतेने कुटुंबीय देहदान करीत नाहीत. माझ्या आईचे देहदान करतानाही हीच परिस्थिती होती. आईच्या संकल्पाविषयी नातेवाईकांना समजावल्यानंतर अखेर तिच्या इच्छेनुसार देहदान केले. पुढच्या जन्माचा विचार करण्यापेक्षा देहदानाच्या माध्यमातून याच जगात जगता येते, याचा विचार केला पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी. आर. बोरा म्हणाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि.१८) महात्मा गांधी सभागृहात ‘देहदान ऋणनिर्देश सोहळा’ घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून न्या. पी. आर. बोरा बोलत होते. सोहळ्यात मागील क ाही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी केलेल्या देहदानाबद्दल कुटुंबियांचा सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आले. 

Web Title:  Life in this life from the life of the next birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.