दंगलीची चौकशी ४ तासांत उरकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:47 AM2018-06-29T04:47:23+5:302018-06-29T04:47:26+5:30

राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गुरुवारी अवघ्या चार तासांत मिटमिटा दंगलीची चौकशी उरकल्याचे समोर आले. यावेळी मिटमिटा येथील दंगलग्रस्त नागरिक

The inquiry into the riots was over in 4 hours | दंगलीची चौकशी ४ तासांत उरकली

दंगलीची चौकशी ४ तासांत उरकली

googlenewsNext

औरंंगाबाद : राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गुरुवारी अवघ्या चार तासांत मिटमिटा दंगलीची चौकशी उरकल्याचे समोर आले.
यावेळी मिटमिटा येथील दंगलग्रस्त नागरिक, नगरसेवक, दंगलग्रस्तांवर लाठीहल्ला करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे समितीने ऐकून घेतले.
कचरा टाकण्याच्या कारणावरून महानगरपालिकेच्या गाड्या अडविणारे मिटमिटावासीय आणि पोलीस यांच्यात जोरदार चकमक होऊन दंगल घडली. मुख्यमंत्र्यांनी दंगलीची चौकशी करण्याचे विधिमंडळात जाहीर केले होते.
ही चौकशी समिती बुधवारी सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाली. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयात चार तासांत दंगलीची चौकशी केली.
सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मिटमिटा येथील नागरिकांच्या वतीने नगरसेवक रावसाहेब आमले यांनी समितीकडे केली.

Web Title: The inquiry into the riots was over in 4 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.