व्यवस्थेचे निष्पाप बळी ; हादरले आसमंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:17 AM2017-08-06T00:17:38+5:302017-08-06T00:17:38+5:30

थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ते दोघे विजातीय होते व आर्थिक स्थितीने कमकुवत होते.

Innocent victims of the system; Hudarle ostentatious! | व्यवस्थेचे निष्पाप बळी ; हादरले आसमंत !

व्यवस्थेचे निष्पाप बळी ; हादरले आसमंत !

googlenewsNext

थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ते दोघे विजातीय होते व आर्थिक स्थितीने कमकुवत होते. नसता ते केव्हाच खुनशी निर्दयी दुनियेच्या नजरेआड झाले असते, याच संधीचा फायदा घेऊन भाऊ दिगंबर दासरे याने डाव साधला. चुलतभाऊ मोहन दासरेच्या मदतीने २३ जुलै रोजी बहिणीस तुझ्या मर्जीप्रमाणे लग्न लाऊन देतो, असे म्हणून विश्वासात घेतले. भोळ्या भाबड्या बहिणीने भावावर विश्वास ठेवला. ज्या भावाच्या हाताला जन्मभर राखी बांधली त्याच हाताने बहिणीचा गळा चिरला. शेवट इथेच संपला नाहीतर निर्ढावलेल्या हाताने बहिणीच्या प्रियकराचाही गळा चिरला. दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. क्षणात सर्व काही संपले. पुन्हा एकदा एका प्रेमी युगुलाचा अंत झाला. जातीयता हा समाजव्यवस्थेला लागलेला कलंक. त्याने परत डोके वर काढले. जातीयतेचे बंध तोडून नवसमाज निर्मितीसाठी ज्यांनी रक्ताचे पाणी केले त्यांच्या कार्याची नुसती आठवण केल्या गेली; पण प्रत्यक्षात आजही असे प्रकार विचार करायला लावणारे घडत आहेत. ‘जात नाही ती जात’ असे म्हणणाºयांचे खरे ठरले व या उदाहरणावरून स्पष्ट झाले आणि जातीयतेचा बीमोड करणारे कार्य चर्चेत आले. अशीच विचार करायला लावणारी घटना तालुक्यात ५ दिवसानंतर घडली. त्याही घटनेने मानवतेचा अंत पाहिला. मागील खरीप हंगामात शेतकºयांना पीक विम्याचा लाभ बºयापैकी मिळाला. आर्थिक संकटात या योजनेने शेतकºयांना तारले, म्हणून यावर्षीच्या खरीप हंगामातसुद्धा शासनाने खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना कार्यान्वित केली. त्यानुसार १ ते ३१ जुलैच्या कालावधीत विमा भरणे निश्चित होते, परंतु शासनाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमात एक नव्हे, अनेक अडचणी आल्या. नियोजनाचा अभाव, तांत्रिक बिघाड, मनुष्यबळ यासारख्या कितीतरी अडचणींमुळे शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यातच तालुक्यातील दिवशी (बु) चा अल्पभूधारक शेतकरी रामा पोतरे हा किनी येथे बँकेसमोर झालेल्या गर्दीत रेटारेटीमुळे हृदयविकाराने मृत्यू पावला. या एका शेतकºयाच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. विधानसभेत विषय चर्चेला गेला. शासनाने मदत जाहीर केली. रामाचे वृद्ध आईवडील, पत्नी, दोन जुळी ९ वर्षांची लेकरं यांचे शासकीय मदतीवर भागेल काय? एवढ्यावर प्रश्न संपला असे नाही, तर त्या मृत शेतकºयाचा दोष काय? ज्यास अवेळी मरण आले, त्याच्या कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांचे काय?

Web Title: Innocent victims of the system; Hudarle ostentatious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.