प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद

By Admin | Published: January 9, 2015 12:41 AM2015-01-09T00:41:55+5:302015-01-09T00:53:01+5:30

औरंगाबाद : केळुस्करांनी ‘तीळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, पावसाळा दूर आहे अजून पण तेव्हापासून माझ्या मनात मोर नाचू लागले’

Happy poems are full of rave reviews | प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद

प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद

googlenewsNext


औरंगाबाद : केळुस्करांनी ‘तीळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, पावसाळा दूर आहे अजून पण तेव्हापासून माझ्या मनात मोर नाचू लागले’ ही आंब्याफणसाच्या गंधाची मुक्तछंदातली प्रेमकविता म्हटली. त्यानंतर अर्थातच त्यांना फर्माईश झाली ती ‘झिनझिनाट’ची. नुकत्याच पंचविशीत पाऊल ठेवलेल्या या हळव्या कवितेने अक्षरश: मंत्रमुग्ध केले.
‘पांदीत भेटलंस, अंगास खेटलंस, काळोख किनाट, हातात हात, घेतलंस अकस्मात; झालो झिनझिनाट!’ स्वत:च मूर्तिमंत कविता होत लयदारपणे सादर केलेल्या मालवणी रचनेतून केळुस्करांनी रसिकांना जिंकले. म्हात्रे यांनी ‘ते दिवस आता कुठे’ या रचनेतून रसिकांना स्मरणरंजनात नेले. ‘फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी; पण उगवत्या चांदण्यांवर मालकी वाटायची’ या ओळींतून जागवलेला तरुण काळ दिलखुलास दाद मिळवून गेला. ‘मुंबई लोकमत’चे सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या देखण्या अक्षरसंमेलनाचा समारोप योगीराज माने यांनी ‘किती पाऊस गुणाचा’ या गीतातून केला.

Web Title: Happy poems are full of rave reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.