औरंगाबाद येथील कालबाह्य औषधांच्या पूर्ण नोंदी सादर करण्याचे पालक मंत्री कदम यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 02:13 PM2017-11-23T14:13:40+5:302017-11-23T14:17:13+5:30

रुग्णालय सुरु होण्याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधी कालबाह्य झाल्याने एकच खळबळ उडली होती. या प्रकरणात आता पालक मंत्री रामदास कदम यांनी औषध खरेदीच्या पूर्ण नोंदी सादर करण्याचे आदेश आज दिले आहेत.

Guardian Minister Kadam's order to present complete records of out-of-date medicines | औरंगाबाद येथील कालबाह्य औषधांच्या पूर्ण नोंदी सादर करण्याचे पालक मंत्री कदम यांचे आदेश

औरंगाबाद येथील कालबाह्य औषधांच्या पूर्ण नोंदी सादर करण्याचे पालक मंत्री कदम यांचे आदेश

googlenewsNext

औरंगाबाद : चिखलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा धक्कादायक अहवाल मागील महिन्यात शासनाच्या भांडार तपासणी पथकाने आरोग्य उपसंचालकांना दिला. यानंतर आता आणखी ९० लाखाची औषधी कालबाह्य झाल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणी 'लोकमत' च्या वृत्ताची दाखल घेत पालक मंत्री रामदास कदम यांनी औषध खरेदीच्या पूर्ण नोंदी सादर करण्याचे आदेश आज बैठकीत दिले आहेत.

दरम्यान, याच प्रकरणात आणखी ९० लाखाची औषधे कालबाह्य झाल्याची माहिती मिळाली आहे. ही औषधी लपवून ठेवण्यात आली असून, भरारी पथकासमोर या औषधीची कागदपत्रेच सादर करण्यात आली नव्हती. या प्रकरणी पालकमंत्री रामदास कदम यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जि. एम. गायकवाड यांनी हे वृत्त निराधार असल्याचा दावा केला आहे. तसेच हि औषध खरेदी मिनी घाटीसाठी नसल्याचा दावा केला. मात्र, यावर कदम यांनी खरेदी कुठे होवो वेळे आधी का केली असे विचारत कंपनीने जर  कालबाह्य औषधी बदलून दिली नाहीतर याप्रकरणी चौकशी केली जाईल असे जाहीर केले. 

उच्चस्तरीय चौकशीची गरज
दीड कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही आरोग्य उपसंचालक, मुंबई येथील आरोग्य विभाग अजूनही हे प्रकरण गांभीर्याने हाताळायला तयार नाही. मागील तीन दिवसांपासून फक्त चौकशीचा फार्स मांडण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करणारच, असा आव आणण्यात येत आहे. सर्व वस्तुस्थिती पाण्यासारखी समोर असतानाही काही अधिकारी व कर्मचा-यांना वाचविण्यासाठी स्थानिक स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागाने मुंबईच्या अधिका-यांना पाचारण करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Guardian Minister Kadam's order to present complete records of out-of-date medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.