गंगापूरची आमसभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:27 AM2018-01-23T00:27:36+5:302018-01-23T00:27:58+5:30

गंगापूर येथील आमसभेत आ. प्रशांत बंब यांनी मागील बैठकीत घेण्यात आलेल्या विषयांचे अनुपालन न करणाºया कामचुकार अधिकारी -कर्मचा-यांची चांगलीच खरडपट्टी केली. कर्तव्यात कसूर करणाºया विविध विभागाच्या दोषी कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

 Gangapur assembly took place | गंगापूरची आमसभा गाजली

गंगापूरची आमसभा गाजली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : गंगापूर येथील आमसभेत आ. प्रशांत बंब यांनी मागील बैठकीत घेण्यात आलेल्या विषयांचे अनुपालन न करणा-या कामचुकार अधिकारी -कर्मचा-यांची चांगलीच खरडपट्टी केली. कर्तव्यात कसूर करणा-या विविध विभागाच्या दोषी कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
सोमवारी गंगापूर शहरातील शिवकृपा मंगल कार्यालयात आ. बंब यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पं.स. सभापती ज्योती गायकवाड, उपसभापती संपत छाजेड तहसीलदार चंद्रकांत शेळके, जि.प. सदस्य मधुकर वालतुरे, कृष्णा सुकासे, अप्पासाहेब पाचपुते, गटविकास अधिकारी व्ही.आर.पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, संतोष जाधव, सुमित मुंदडा, शिवप्रसाद अग्रवाल, रामनाथ पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गटविकास अधिकारी व्ही. आर.पाटील यांनी प्रास्ताविकात आमसभेचा उद्देश व तालुक्यातील कामांची थोडक्यात माहिती दिली. तहसीलदारांनी आरोग्य शिबीर यशस्वी आयोजनाबाबत आमदारांचे अभिनंदन केले व टंचाईबाबत माहिती दिली.
गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील रस्ता कामात हलगर्जीपणा करून दर्जाहीन रस्ता तयार केल्याचा ठपका ठेवून आर. जी. फुलारे या ठेकेदाराचे काळ्या यादीत नाव टाकण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस दिले. यावेळी मागील आमसभेचे अनुपालन व टंचाई बैठक पाणीपुरवठा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. कडूबा हिवाळे यांनी मग्रारोहयोअंतर्गत बिले मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
महेश लिंगायत लिंगायत यांनी विहिर करण्यासाठी रोजगार हमी योजनेतील अंदाजपत्रकामध्ये क्रेनचे प्रोव्हिजन असणे आवश्यक असल्याची मागणी केली. दहेगावचे सरपंच विक्रम राऊत यांनी मांडलेल्या ठरावास उपस्थितांनी एकमताने मंजुरी दिली. रामनाथ पाटील यांनी विहिरी मंजुरीबाबत अनेक तक्रारी आहेत, त्या तहसीलदारांनी स्वीकाराव्यात अशी मागणी केली.
संतोष जाधव व सुमित मुंदडा यांनी तहसील कार्यालयाकडून पंचायत समितीला मुद्रांक शुल्क अनुदान रुपये ५० लक्ष प्राप्त झाले होते. गटविकास अधिकारी यांनी त्यातील ३९ लक्ष रुपये परस्पर कपात करून जिल्हा परिषदेला वर्ग केले असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर बंब यांनी मुद्रांक शुल्काचे पैसे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्या आदेशाने कपात केले याचा खुलासा पंचायत समितीस सादर करावा व पंचायत समितीने ते पत्र संबंधित ग्राम पंचायतीना वितरीत करावेत असे आदेश दिले. योगेश शेळके यांनी उपस्थित केलेल्या महावितरणाची हलगर्जीपणामुळे तुटलेल्या तारांची माहिती देऊनही लाईट सोडल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर बंब यांनी सदरील प्रकरणात संबधित अभियंता व कर्मचारी हे दोषी आहेत. गुंडाळलेल्या तारांमध्ये विद्युत पुरवठा सोडण्याची ही कृती हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळे झालेली आहे. या प्रक्रणाची सखोल चौकशी करून संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बंब यांनी दिले.
बैठकीस जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.
सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही आमसभा सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, बांधकाम विभाग, गाय गोठे, एसटी, विद्युत वितरण कंपनी, कृषी विभाग, सिंचन आदी विभागातील विषय चांगलेच गाजले.

Web Title:  Gangapur assembly took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.