महालक्ष्मी सणाला फुलांचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:28 AM2017-08-29T00:28:25+5:302017-08-29T00:28:25+5:30

सध्या सुरु असलेला गणेशोत्सव आणि मंगळवारपासून घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुुरु असून त्यामुळे फुलांचे भाव मात्र वधारले आहेत़ फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या बाजारपेठेत १२५ ते ३०० रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे़

 Flower prices rose in Mahalaxmi celebration | महालक्ष्मी सणाला फुलांचे भाव वधारले

महालक्ष्मी सणाला फुलांचे भाव वधारले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सध्या सुरु असलेला गणेशोत्सव आणि मंगळवारपासून घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुुरु असून त्यामुळे फुलांचे भाव मात्र वधारले आहेत़ फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या बाजारपेठेत १२५ ते ३०० रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे़
गणेशोत्सव सुरु झाल्यापासून नांदेडच्या बाजारपेठेत दर दिवशी जवळपास पाच कोटी रुपयांची उलाढाल होत आहे़ नांदेडच्या बाजारपेठेतूनच संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात फुले पाठविली जातात़, परंतु सध्या गणेशोत्सव सुरु असून मंगळवारपासून घरोघरी महालक्ष्मीचे आगमन होणार आहे़ त्यामुळे बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे़ फुलांची आवक घटल्यामुळे भाव दुपटीने वाढले आहेत़ १२५ रुपये ते ३०० रुपये किलो दराने फुलांची विक्री केली जात असून ७०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत रेडीमेड हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ दरम्यान, नांदेडातील फूल मार्केट मराठवाड्यात क्रमांक एक वर आहे़, परंतु सोयीसुविधांची बोंब आहे़ मनपाकडून कुठल्याच सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत़ मालासाठीही जागा नाही़ त्यामुळे आलेला माल मिळेल त्या भावात त्याच दिवशी विकून मोकळे व्हावे लागते, अशी प्रतिक्रिया जिल्हा होलसेल अ‍ॅन्ड रिटेल फूल विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल अलीम खॉन अब्दुल हमीद खॉन यांनी दिली़

Web Title:  Flower prices rose in Mahalaxmi celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.