एसटीतून प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:30 PM2017-08-17T23:30:51+5:302017-08-17T23:30:51+5:30

प्रवाशांच्या सुरक्षेची हमी घेणाºया एसटी महामंडळाच्या बस गाड्यांमधून प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला.

The first aid boxes are missing from the ST | एसटीतून प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब

एसटीतून प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रवाशांच्या सुरक्षेची हमी घेणाºया एसटी महामंडळाच्या बस गाड्यांमधून प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला.
सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसचा प्रवास निवडला जातो़ मात्र मागील काही वर्षांपासून एसटी प्रवाशांना मिळणाºया सुविधांकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ बसमधून प्रवास करीत असताना प्रकृती स्वास्थ्याविषयी काही प्रश्न निर्माण झाल्यास बस गाडीमध्ये प्रथमोपचार पेटी असणे बंधनकारक आहे़ त्याचप्रमाणे आगीसारख्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी अग्नीशमन यंत्रणा बसमध्ये ठेवलेली असते़ परंतु, मागील काही वर्षांपासून या सुविधांकडे महामंडळ कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे़
या संदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी बसस्थानकावर जाऊन प्रत्यक्ष बस गाड्यांची पाहणी केली़ तेव्हा एकाही बसमध्ये प्रथमोपचार पेटी निदर्शनास आली नाही़ या पाहणी दरम्यान, १५ बसेची तपासणी करण्यात आली़ गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास या पाहणीला सुरुवात करण्यात आली़ परभणी बसस्थानकावर अकोला-धारूर ही बस उभी होती़ बसमध्ये चढून प्रथमोपचार पेटीचा शोध घेतला़ परंतु, पेटी मिळून आली नाही़ त्यानंतर या बसच्या शेजारीच असलेल्या परभणी-हिंगोली (एमएच २० बीएल- २३१८) या बसमध्येही प्रथमोपचार पेटी नसल्याचे दिसून आले़ विशेष म्हणजे, किमान लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये तरी प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध असेल, अशी अपेक्षा होती़ त्यामुळे औरंगाबाद-देगलूर या हायकोर्ट एक्सप्रेस नावाने चालविल्या जाणाºया बसची (क्रमांक एमएच २० बीएल-४०१४) पाहणी केली़ तेव्हा या बसमध्ये देखील प्रथमोपचार पेटी आढळली नाही़ परभणी-लातूर या (एमएच २० बीएल- ३७८८) बसमध्ये प्रथमोपचार पेटी होती़ परंतु, त्यात काहीही नव्हते़ तर रिसोड-सोलापूर या बसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेटीत चक्क डास मारण्याचे क्वॉईल ठेवले असल्याचे दिसून आले़ याच दरम्यान, परभणी-लातूर, परभणी-कुंभारी बसेसमध्येही प्रथमोपचार पेट्या गायब असल्याचे या पाहणीत निदर्शनास आले़ काही बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या आढळल्या़ परंतु, त्यात उपचाराची कुठलीही साधने नव्हती़ प्रवासी सेवेसाठी बस रस्त्यावर दाखल होताना या सर्व सुविधा दिल्या जातात़ परंतु, त्याची देखभाल होत नाही़ परिणामी काही ठिकाणी केवळ नावापुरते प्रथमोपचार बॉक्स ठेवले असल्याचेच पहावयास मिळाले़

Web Title: The first aid boxes are missing from the ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.