अखेर २0 केएल आॅईल मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:17 PM2017-11-17T23:17:35+5:302017-11-17T23:17:48+5:30

जिल्ह्यात जवळपास १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडे आॅईल नसल्याने डीपी दुरुस्तीला ब्रेक लागला होता. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर २0 केएल आॅईल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Finally, we will get 20 kg of oil | अखेर २0 केएल आॅईल मिळणार

अखेर २0 केएल आॅईल मिळणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात जवळपास १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडे आॅईल नसल्याने डीपी दुरुस्तीला ब्रेक लागला होता. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर २0 केएल आॅईल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात अनेक रोहित्रांवर अतिरिक्त भार वाढला आहे. अनेक भागात वीजचोरीवर आळा घालणे महावितरणला जमले नाही. खेडो-पाडी, शहरात व कृषीपंपासाठीही अवैध जोडण्या घेतलेल्या ठिकाणी दुरुस्त करून आणून लावलेले रोहित्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा जळत आहे. विशेष म्हणजे इमानेइतबारे बिल भरणारेच यामुळे अडचणीत येत असताना ही मंडळी अशा वीजचोरीबाबत तक्रार करीत नाही. महावितरणही कारवाई करीत नाही. त्यामुळे ही समस्या आता गंभीर बनू लागली आहे. जळणाºया रोहित्रांची संख्या वाढतच चालली आहे. यात १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळालेले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी २८ केएलच्या आसपास आॅईल लागते. मात्र ५ केएलच आॅईल मिळाले.
आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे हा प्रश्न गेल्यानंतर त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यांनी २0 केएल आॅईल पाठविण्यास सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी हे आॅईल मिळताच येथे डीपी दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शेतकºयांना जळालेले रोहित्र दुरुस्त करून मिळणार आहे. त्यामुळे कृषी व गावातील वीज सुरळीत होणार आहे.

Web Title: Finally, we will get 20 kg of oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.