मूर्तीच्या कारखान्यात स्फोट : एक कामगार ठार; मालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:23 AM2017-11-28T01:23:56+5:302017-11-28T01:24:01+5:30

सिल्लोड शहरातील नामांकित शिल्पकार सासमकर यांच्या मूर्तीच्या कारखान्यात एयर कॉम्प्रेशरचा स्फोट झाल्याने एक कामगार जागीच ठार झाला, तर शिल्पकार राजेंद्र सासमकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे. ही घटना दुपारी साडेतीन वाजता घडली.

 Explosion in idol factory: One worker killed; Owner seriously injured | मूर्तीच्या कारखान्यात स्फोट : एक कामगार ठार; मालक गंभीर जखमी

मूर्तीच्या कारखान्यात स्फोट : एक कामगार ठार; मालक गंभीर जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : सिल्लोड शहरातील नामांकित शिल्पकार सासमकर यांच्या मूर्तीच्या कारखान्यात एयर कॉम्प्रेशरचा स्फोट झाल्याने एक कामगार जागीच ठार झाला, तर शिल्पकार राजेंद्र सासमकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे. ही घटना दुपारी साडेतीन वाजता घडली.
शहरातील बाजार समिती आवारात असलेल्या सासमकर आर्ट स्टुडीओत दुपारी मूर्ती रंगरंगोटीचे काम सुरु असताना अचानक एयर कॉम्प्रेशरचा स्फोट झाला. यात कामगार महादू कदम (१९, रा. कदमवाडी, सिल्लोड) हा जागीच ठार झाला. हा कारखाना पत्राच्या दुकानात थाटलेला असल्याने स्फोट होताच त्या
आवाजाने परिसरातील व्यापारी, बाजार समिती परिसरातील कामगार, कर्मचाºयांनी धाव घेऊन राजेंद्र सासमकर यांना तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविले.
महादू कदम याचा मृतदेह सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविला.
सिल्लोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील यांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची नोंद घेतली.
ओळख पटणेसुध्दा कठीण
एयर कॉम्प्रेशर टँकचा स्फोट एवढा भीषण होता की, महादू हा मशीनजवळ असल्याने त्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. त्याची ओळख पटणेसुध्दा कठीण झाले होते.
मोठी दुर्घटना टळली
सासमकर आर्ट स्टुडिओ हा पत्र्याचा शेडमध्ये असून याच्या बाजूलाही पत्र्याचेच शेड आहे. त्यात भुसार व धान्याची दुकाने आहेत.
स्फोट होऊन जर आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र या स्फोटाचा परिणाम आजूबाजूला न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
घरातील कमावता मुलगा गेला
या दुर्घटनेत मरण पावलेला महादू कदम हा घरातील मोठा मुलगा असल्याने परिवाराची जबाबदारी तोच सांभाळत होता. त्याचा एक छोटा भाऊ दहावीत असून त्याच्या तीन बहिणींचे लग्न झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून केवळ अर्धा एकर शेती आहे. ती शेती आई -वडील बघतात. घरातील कमवता मुलगा गेल्याने कदम परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

Web Title:  Explosion in idol factory: One worker killed; Owner seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.