सव्वालाख विद्यार्थ्यांच्या अंगावर ड्रेस !

By Admin | Published: September 1, 2014 01:04 AM2014-09-01T01:04:19+5:302014-09-01T01:08:53+5:30

भालचंद्र येडवे , लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सव्वालाख पात्र लाभार्थ्यांच्या अंगावर सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे ड्रेस शिक्षण विभागामार्फत वितरित करण्यात आल्याने

Dress on the face of Savawakakh students! | सव्वालाख विद्यार्थ्यांच्या अंगावर ड्रेस !

सव्वालाख विद्यार्थ्यांच्या अंगावर ड्रेस !

googlenewsNext


भालचंद्र येडवे , लातूर
स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सव्वालाख पात्र लाभार्थ्यांच्या अंगावर सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे ड्रेस शिक्षण विभागामार्फत वितरित करण्यात आल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी पालकांत उत्साहाचे वातावरण आहे़
जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिली ते आठवी वर्गात शिकत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील १ लाख १६ हजार ४७१ मुलांना सुमारे २ कोटी २४ लाख रूपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता़ सदर निधी तालुकास्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात आला़ जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मोफत गणवेश वितरण करण्यात आले़ जिल्ह्यातील शंभर टक्के होतकरू विद्यार्थ्यांना पहिला संचाचा लाभ मिळाल्याने सर्वत्र कौतूक होत आहे़ पाठ्यपुस्तके वाटप़़़
यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या ३ कोटी ७५ लाख ५५१ पात्र लाभार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आले आहेत़ गणवेशासोबतच विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पुस्तके पडल्याचा आनंदही द्विगुणित होत आहे़ बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात ५० वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत़ या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, वर्गखोल्यांचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात येणार आहे़ पुनर्रचित अभ्यासक्रम बदलानुसार इयत्ता तिसरी व चौथीसाठी शिकविणाऱ्या ५ हजार २०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ चालू शैक्षणिक वर्षामध्ये वाचन, लेखन व गणित कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंत गुणवत्ता संवर्धनासाठी विशेष प्रशिक्षणाचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात आले आहे़ त्यानुसार त्रिस्तरीय पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे़
सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्णातील उदगीर तालुक्यात १०० शाळांमध्ये पहिली ते चौथीसाठी प्रायोगिक तत्वावर वाचन, लेखन व गणित कार्यक्रम प्रभावीपणे घेण्यात आला होता़ याची यशस्वीता पाहता सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्णातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच शाळांमधून हा उपक्रम घेण्यात येणार आहे़
राज्यभरात कौतूक़़़़़
४जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांच्या संकल्पनेतून व जि़प़चे शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्णात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे राज्यभरात दखल घेण्यात आली आहे़

Web Title: Dress on the face of Savawakakh students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.