वाळूज महानगरात घरपोच सिलिंडर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:34 PM2019-05-25T22:34:56+5:302019-05-25T22:35:00+5:30

वाळूज महानगर: ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तरीही वाळूज महानगरात बहुतांशी एजन्सी चालकांकडून एजन्सीसमोर किंवा ...

The cylinders come in the cottage in the metropolis of Walaj | वाळूज महानगरात घरपोच सिलिंडर मिळेना

वाळूज महानगरात घरपोच सिलिंडर मिळेना

googlenewsNext

वाळूज महानगर: ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तरीही वाळूज महानगरात बहुतांशी एजन्सी चालकांकडून एजन्सीसमोर किंवा रस्त्यावरच ग्राहकांना सिलिंडरचे वाटप केले जात आहे. एजन्सी चालकाच्या मनमानीमुळे ग्राहकांना सिलिंडरची स्वत:च धोकादायकरित्या ने-आण करावी लागत असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे पुरवठा विभाग मात्र डोळेझाक करित असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


वाळूज महानगरात घरपोच गॅस सिलिंडर सेवा पुरती कोलमडली आहे. गॅस एजन्सी चालकाकडून बहुतांशी ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडरचे वाटप न करता पैशाची बचत करण्यासाठी एजन्सीसमोर किंवा एखाद्या चौकात उभे रहावून भर रस्त्यावरच सिलिंडरचे वाटप केले जात आहे. मात्र गरजेपोटी ग्राहकांना नाईलाजाने हा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर सिलिंडर वाटप केले जात असल्याने ग्राहकांना दुचाकी, सायकल तसेच डोक्यावर धोकादायकरित्या सिलिंडरची ने-आण करावी लागत आहे. ग्राहकांना नोंदणी केल्यानंतर साधारणत: एका आठवड्यात सिलिंडर घरपोच मिळणे आवश्यक आहे. परंतू तसे होताना दिसत नाही. बऱ्याचदा नोंदणी करूनही दोन-दोन आठवडे सिलिंडर मिळत नसल्याची ग्राहकांची ओरड आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून स्टोव्ह, विजेवर चालणारी शेगडी आदीचा वापर केला जातो. मात्र सततची लोडशिडिंग व केरासीनचा तुटवडा यामुळे पर्यायी व्यवस्थाही कुचकामी ठरत आहे. त्यामुळे सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांना काम बुडवून सारख्या चकरा माराव्या लागत आहेत. एजन्सीचालकाच्या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. यातून बºयाचदा ग्राहक व एजन्सी कर्मचारी यांच्यात वादाच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे पुरवठा विभाग सोयीस्कररित्या डोळेझाक करित असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


ग्राहकांची लूट ..
बºयाचदा मिळालेल्या सिलिंडरमध्ये रेग्युलेटर न बसणे, गॅस लिकीज होणे आदी अडचणी येतात. या संदर्भात ग्राहकांनी तक्रारी केल्यास त्या जाणीवपूर्वक टाळल्या जातात. या तक्रारी विनाशुल्क सोडविणे आवश्यक असतानाही यासाठी वेगळे शुल्क आकारले जातात. त्याचबरोबरच येण्या-जाण्याच्या भाड्याचे पैसेही मागितले जातात. ग्राहक ांनी पैसे देण्यास नकार दिल्यास अथवा पैसे कमी दिल्यास पुन्हा दुरुस्तीसाठी येणार नसल्याचे एजन्सीचे कर्मचारी उत्तर देतात. त्यामुळे नाईलाजाने अधिकचे पैसे द्यावे लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

Web Title: The cylinders come in the cottage in the metropolis of Walaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज