‘त्या’ कंटनेरचालकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:16 PM2019-04-14T23:16:10+5:302019-04-14T23:16:20+5:30

दुचाकीस्वार कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या फरार कंटनेरचालकास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात पकडले आहे.

 The 'container' caught | ‘त्या’ कंटनेरचालकास पकडले

‘त्या’ कंटनेरचालकास पकडले

googlenewsNext

वाळूज महानगर : दुचाकीस्वार कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या फरार कंटनेरचालकास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात पकडले आहे.


शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. यात रामेश्वर सहाने याचा मृत्यू झाला होता. तर शंकर घायवट हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वाळूज एमआयडीसीत कंटेनरचालकास (एमएच-४६ बीएफ ७१५५) पकडले.

मात्र, हा अपघात आपल्याकडून घडला नसून, दुचाकीला धडक देणारा कंटेनर नगर रोडने गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने अहमदनगर हद्दीत जाऊन कंटेनर (एमएच-४६ बीएफ ७५५५) चालक मोहम्मद निसार शेख (रा.धारावी, मुंबई) याला पकडले. या अपघातास आपणच जबाबदार असून, मारहाणीच्या भीतीमुळे पसार झाल्याचे मोहम्मद निसार याने पोलिसांना सांगितले. 

Web Title:  The 'container' caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.