अखेर सिडको येणारच..!

By Admin | Published: July 31, 2014 12:06 AM2014-07-31T00:06:43+5:302014-07-31T00:46:06+5:30

जालना : सिडकोच्या रूपाने जुळे शहर उभारण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

CIDCO will come soon ..! | अखेर सिडको येणारच..!

अखेर सिडको येणारच..!

googlenewsNext

जालना : सिडकोच्या रूपाने जुळे शहर उभारण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शहरात सिडको आणण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. सिडकोचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी नवीन प्रस्तावासाठी दोन ठिकाणी जागांची पाहणीही करण्यात आल्याचे समजते.
नागेवाडीचा प्रस्ताव आता मागे पडला असून नवीन जागेचा शोध घेतला जात आहे. औद्योगिकीकरण आणि वाढते शहर विचारात घेता सिडकोला मोठी संधी आहे.
जालना शहराची ‘अमीबा’ सारखी होणारी वाढ नागरीसुविधांच्या मुळावर आली आहे. ही बाब विचारात घेऊन पालकमंत्री राजेश टोपे यांनी नगर विकास राज्यमंत्री असताना नऊ वर्षांपूर्वी नागेवाडी शिवारात सिडको वसाहत निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
मात्र स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांनी औद्योगिक पट्ट्यात निवासस्थाने उभारण्यास तीव्र विरोध केला होता. त्यामुळे ही वसाहत आडगळीत पडली आहे.
अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर जागा मालकांना पैसे देण्यासाठी तरतूदही केली होती. ही रक्कम उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर असतांना सर्वकाही ठप्प झाले.
आठ दिवसांपूर्वी सिडकोचा आढावा घेण्यात आला.
मंठा आणि अंबड मार्गाची पाहणी करण्यात आली आहे.
औरंगाबाद मार्गावर शेतकऱ्यांचा वाद असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शिवाय ही जागा पूर्णत: प्रदूषणाच्या विळख्यात आहे.
चंदनझीरा आणि नागेवाडी हा परिसर धुरामुळे त्रस्त आहे.
त्यामुळे या भागात नवीन वसाहतीची उभारणी धोक्यात आली आहे.
(वार्ताहर)
येत्या १० ते १२ दिवसांत ठोस निर्णय अपेक्षित
मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सांगितले, येत्या १० ते १२ दिवसात सिडकोचा ठोस निर्णय होणार आहे. आत्ताच काही सांगणे योग्य होणार नाही. दोन जागांची पाहणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणती जागा निवडली जाणार याचाही निर्णय समोर येईल.
सिडकोची वसाहत तळ्यात-मळ्यात सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुनील केंद्रेंकर रूजू झाले आहेत. त्यांनी दोन जागांची पाहणी केली. अजूनही ठोस निर्णय झाला नसला तरी नवीन व सर्वसुविधांनी युक्त असे नवीन शहर नावारूपास येण्याची जालनेकरांची इच्छा प्रत्यक्षात उतरणार आहे.

Web Title: CIDCO will come soon ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.