चहल यांची उपमहापौरांविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:55 AM2018-09-14T00:55:12+5:302018-09-14T00:55:30+5:30

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी बुधवारी रात्री उपमहापौर विजय औताडे यांच्या विरोधात सभागृहात डांबून ठेवत संचिकांवर सह्या घेतल्याची तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली

Chahal's complaint against Deputy Mayor | चहल यांची उपमहापौरांविरोधात तक्रार

चहल यांची उपमहापौरांविरोधात तक्रार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी बुधवारी रात्री उपमहापौर विजय औताडे यांच्या विरोधात सभागृहात डांबून ठेवत संचिकांवर सह्या घेतल्याची तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान एमजीपीमधून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत आलेल्या चहल यांना कार्यमुक्त करून त्यांना त्यांच्या विभागात परत पाठविण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या आहेत.
अधिका-यांनी मर्यादेत राहण्याचा इशारा गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला असून, पाणीपुरवठ्याच्या संचिकांवरून पालिकेत सुरू असलेल्या संघर्षाने राजकारणाचे वळण घेतले आहे.
मंगळवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना उपमहापौरांनी चहल यांना महापौरांच्या दालनात एक तास बसवून ठेवत धक्काबुक्की करीत पाणीपुरवठ्याच्या संचिकांवर सह्या करण्यास भाग पाडल्याच्या घटनेने पालिकेत प्रशासनविरुद्ध सत्ताधारी असा वाद पेटला आहे. त्यामुळे चहल यांनी उपमहापौरांच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अद्याप पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले, चहल यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. हा विषय मनपाच्या सभेशी संबंधित आहे. अर्जाची चौकशी सुरू आहे.
चहल यांनी बुधवारी रात्री सिटीचौक पोलीस ठाणे गाठून औताडे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे.
पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यावरून कारवाईचा काहीही निर्णय घेतला नव्हता. दरम्यान कोणतेही पुरावे नसताना तक्रारीची दखल घेण्यात येऊ नये, याबाबत महापौर पोलीस आयुक्तांशी बोलणार आहेत. याप्रकरणी चहल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी उपमहापौरांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर उपमहापौरांशी या प्रकरणी संपर्क झाला नाही.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री पावणेबारा वाजेपर्यंत चहल दाम्पत्य होते. चहल यांच्या पत्नीसोबत एका कंत्राटदाराने अरेरावीची भाषा केल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याची तयारी केली होती. चहल हे सिटीचौक पोलीस ठाण्यातून पुंडलिकनगर ठाण्यात आले. तत्पूर्वी काही गुंड त्यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात आले होते. त्या गुंडांनी माध्यम प्रतिनिधींसोबत हुज्जत घातली. आपसात हे प्रकरण मिटल्याने तक्रार दाखल झाली नाही. चहल यांच्या बंगल्याच्या बांधकाम व्यवहारातून वाद झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Chahal's complaint against Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.