औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:16 AM2018-07-03T00:16:36+5:302018-07-03T00:18:20+5:30

शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत शहरवासीयांचे मात्र पाण्यासाठी हाल सुरू असल्याचे चित्र आहे.

Aurangabadkars now get 2 days to get water | औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी

औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा ‘तीन दिवसांआड’मध्ये नापास : नगरसेवकांच्या दबावामुळे आयुक्तांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत शहरवासीयांचे मात्र पाण्यासाठी हाल सुरू असल्याचे चित्र आहे.
शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा, असा आदेश ११ मे रोजी काढण्यात आला होता. या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी प्रशासनाला करता आलेली नाही. त्यातच आज पुन्हा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, असे आदेश दिले.
भाजप नगरसेवकांनी १० मे रोजी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात ‘झोपा काढा’आंदोलन केले होते. शहरातील सर्व वॉर्डांना समान पाणीवाटप करा, अशी मागणी नगरसेवकांची होती. तत्कालीन प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी ११ मे रोजी शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा, असे आदेश दिले. आजही शहरातील मोजक्याच वॉर्डांमध्ये तीन दिवसाआड पाणी येते. काही वॉर्डांमध्ये पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. तीन दिवसाआड पाण्याचे श्रेय भाजपला जाऊ नये म्हणून महापौर नंदकुमार घोडेलेंनंतर सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसाआड पाणी द्या, असा तगादा लावला. पाणीपुरवठा विभाग तीन दिवसाआड पाणी देण्यास असमर्थ ठरत असल्याचा ठपका मनपा आयुक्त निपुण विनायक यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर ठेवला. चहल यांच्याकडील पदभार काढून घेत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना देण्यात आला. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. जिकडे-तिकडे पाण्यासाठी ओरड सुरूच आहे. अनेक वॉर्डांत पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी येत असल्याची परिस्थिती आहे.
अनेक वॉर्डांत
सहाव्या दिवशी पाणी
शहागंज पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या १८ वॉर्डांना आजही सहाव्या दिवशीच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भीमनगर, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी परिसरात मूळ वेळापत्रकानुसार तिसऱ्या दिवशी पाणी देण्याची योजना आहे; मात्र याठिकाणी चौथ्या दिवशी पाणी येते.
नियोजनच नाही
सोमवारी सकाळी आयुक्त डॉ. विनायक यांनी शिवसेनेच्या दबावाला बळी पडत कार्यालयीन ‘आदेश’काढले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा, असेही
आदेशात नमूद केले आहे; मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे यासंबंधीचे कोणतेच नियोजन नसल्याचे समोर येत आहे.
भाजपचे कचरा अस्त्र
४शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आदेश काढल्यानंतर महापालिकेत भाजप बॅकफूटवर आली होती. सायंकाळी भाजपने कच-याचे अस्त्र बाहेर काढून सेनेला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये मागील काही महिन्यांपासून शंभर टक्के ओला व सुका कचरा वेगळा करून प्रक्रिया करण्यात येत आहे.
४या भागातील ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून मशीन बसविण्याची मागणी आज मनपा आयुक्तांकडे भाजपच्या सर्व नगरसेवकांनी केली. आयुक्तांनी ही मागणी मान्य केली. कचरा प्रशासनात प्रशासनाला सहकार्य करणाºया वॉर्डांना विकास निधीत झुकते माप द्यावे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. भाजप आणि मित्रपक्षाच्या नगरसेवकांचे पाच वॉर्ड आदर्श करून दाखविण्यात येणार आहेत.
४उपमहापौर विजय औताडे यांच्या दालनात भाजप नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनाही बोलावण्यात आले. शिष्टाचार बाजूला ठेवून आयुक्तही उपमहापौरांच्या दालनात पोहोचले. महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक आहेत. प्रशासनाने २३ नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन बसवून देण्याची मागणी आयुक्तांनी मान्य केली. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये दुसºया वॉर्डांचा कचरा अजिबात आणण्यात येऊ नये, असेही मत भाजप नगरसेवकांनी व्यक्त केले. बैठकीला दिलीप थोरात, पूनम बमणे, सुरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दांडगे, बालाजी मुंढे, राज वानखेडे, माधुरी अदवंत, कीर्ती शिंदे, पुष्पा रोजतकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Aurangabadkars now get 2 days to get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.