औरंगाबादकरांना स्मार्ट सिटी बसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:24 AM2017-12-08T00:24:04+5:302017-12-08T00:24:08+5:30

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराची जीवनवाहिनी असते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून हालचाल सुरू आहे; परंतु पाच, दहा बस देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीचा विचार करून चांगल्या आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे.

Aurangabadkar waiting for the smart city bus | औरंगाबादकरांना स्मार्ट सिटी बसची प्रतीक्षा

औरंगाबादकरांना स्मार्ट सिटी बसची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देसार्वजनिक वाहतुकीचे जाळे पसरावे शहरभर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराची जीवनवाहिनी असते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून हालचाल सुरू आहे; परंतु पाच, दहा बस देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीचा विचार करून चांगल्या आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे.

एसटी महामंडळाच्या कारभारामुळे काही वर्षांपासून शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढेपाळली आहे. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून एकप्रकारे शहर बससेवा आपल्या खांद्यावरून महानगरपालिकेच्या खांद्यावर सोपविण्याचे प्रयत्न एसटी महामंडळाकडून वेळोवेळी झाले; परंतु या नुकसानीला कोणत्या बाबी कारणीभूत आहेत, याचा विचारच केला गेला नाही. त्यामुळे शहरातील केवळ १३ मार्गांवर अवघ्या ३१ शहर बसेस धावत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पाच बस खरेदी करून त्या चालविण्यासाठी महामंडळाला देण्यात येणार आहेत.

जानेवारी २०१८ पासून या पाच बस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या पाच बसेस सुरू करताना पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. ही व्यवस्था चांगली असेल तर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणाचा ताण कमी होईल. शहरात अधिकाधिक लोकांना कमीत कमी वेळात पाहिजे त्याठिकाणी किफायतशीर दरात जाता यावे, हाच मुख्य उद्देश ठेवून नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे जाळे शहरभर पसरविले पाहिजे.

स्मार्ट सिटीच्या प्रवासात आता शहर बससेवेचा विचार होत आहे. त्यामुळे किमान पुढील काही महिन्यांत औरंगाबादेत सक्षम शहर बसचे दर्शन औरंगाबादकरांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रस्त्यांवर रिक्षांचे साम्राज्य, त्यांची मनमानी थांबविण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. शहर बसला प्रतिसाद असतानाही एसटी महामंडळ नेहमीच जबाबदारी झटकत होते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. परंतु यापुढे शहरात प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस देणे आवश्यक आहे. चिकलठाणा, मुकुं दवाडी भागातून विद्यापीठात जाणाºया विद्यार्थ्यांना औरंगपुºयापर्यंत बसने आणि त्यानंतर तेथून विद्यापीठाचा प्रवास रिक्षाने करावा लागतो. अशीच स्थिती इतर भागांची आहे. ती अवस्था दूर व्हावी, अशी सर्वसामान्य प्रवाशांची अपेक्षा आहे. चिकलठाणा ते वाळूज मार्गावर किमान दर २० मिनिटाला शहर बस उपलब्ध झाली पाहिजे. शिवाजीनगर, शहानूरमियाँ दर्गा चौक, सिल्लेखाना चौक, समर्थनगर, सातारा, देवळाईसह शहरातील विविध भागांत ठराविक वेळेत शहर बसची सुविधा मिळाली पाहिजे.

अत्यावश्यक मार्गांवर सेवा
सध्या चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे आजघडीला अत्यावश्यक मार्गांवर शहर बस चालविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
-संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

सर्वसामान्यांना सुविधा
शहरातील रस्त्यांनुसार कोणत्या भागात कोणत्या आकाराची बस अधिक चांगली राहील, याचे नियोजन केले जात आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून शहर बससेवा देण्यास प्राधान्य दिले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे अन्य वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राहील, असे नियोजन केले जात आहे.
-नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

Web Title: Aurangabadkar waiting for the smart city bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.