औरंगाबादची पुण्याच्या युनायटेड संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:21 AM2018-09-25T00:21:37+5:302018-09-25T00:23:13+5:30

साईप्रसाद नायडू आणि आकाश बोराडे यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर औरंगाबादने आज एडीसीए मैदानावर एमसीएच्या अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या युनायटेड एस.सी. संघावर ६ गडी राखून मात केली. युनायटेड एस. सी. संघाने प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकांत ८ बाद २५७ धावा फटकाल्या.

Aurangabad beat Pune United | औरंगाबादची पुण्याच्या युनायटेड संघावर मात

औरंगाबादची पुण्याच्या युनायटेड संघावर मात

googlenewsNext

औरंगाबाद : साईप्रसाद नायडू आणि आकाश बोराडे यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर औरंगाबादने आज एडीसीए मैदानावर एमसीएच्या अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या युनायटेड एस.सी. संघावर ६ गडी राखून मात केली.
युनायटेड एस. सी. संघाने प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकांत ८ बाद २५७ धावा फटकाल्या. त्यांच्याकडून शिवेंद्र भुजबळ याने ८६ चेंडूंत ७ चौकारांसह सर्वाधिक ७३ धावा केल्या. गौरव शिंदेने ५६ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५१ व अथर्व गायकवाडने ७७ चेंडूंत ६ चौकारांसह ४७ धावा केल्या. औरंगाबादकडून हरमीतसिंग रागी याने ४९ धावांत ३ गडी बाद केले. करण लव्हेरा आणि ओमकार गुंजाळ यांनी प्रत्येकी २, तर आदर्श बागवाले याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात औरंगाबादने विजयी लक्ष्य ४८ षटकांत ४ गडी गमावून गाठले. औरंगाबादकडून साईप्रसाद नायडू याने १0५ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ७४ व आकाश बोराडे याने ८४ चेंडूंतच ९ चौकार व एका षटकारासह ७३ धावांची सुरेख खेळी केली. विश्वास वाघुले याने २५ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद २७ व आकाश पाटीलने ४३ चेंडूंतच ४ चौकार व एका षटकारासह ४0 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
युनायटेड एस. सी., पुणे : ५0 षटकांत ८ बाद २५७.(शिवेंद्र भुजबळ ७३, गौरव शिंदे ५१, अथर्व गायकवाड ४७. हरमितसिंग रागी ३/४९, करण लव्हेरा २/४८, ओमकार गुंजाळ २/३५, आदर्श बागवाले १/५0).
औरंगाबाद : ४८ षटकांत ४ बाद २६१. (साईप्रसाद नायडू नाबाद ७४, आकाश बोराडे ७३, आकाश पाटील ४0, विश्वास वाघुले नाबाद २७. शिवम पांडुरंग २/३८).

Web Title: Aurangabad beat Pune United

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.