आंतरराज्यीय टोळीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:46 AM2017-07-26T00:46:08+5:302017-07-26T00:48:08+5:30

नांदेड: जिल्ह्यासह लातूर, कर्नाटक, हैदराबादमध्ये दुचाकी चोरी आणि दरोडे घालणाºया आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले़ एका संशयित दुचाकीचोरावरुन पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला

antararaajayaiya-taolailaa-pakadalae | आंतरराज्यीय टोळीला पकडले

आंतरराज्यीय टोळीला पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपींकडून १९ दुचाकी आणि १ जीप जप्त स्थानिक गुन्हे शाखेने सहा जणांना ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यासह लातूर, कर्नाटक, हैदराबादमध्ये दुचाकी चोरी आणि दरोडे घालणाºया आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले़ एका संशयित दुचाकीचोरावरुन पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून आरोपींकडून १९ दुचाकी आणि १ जीप जप्त करण्यात आली आहे़ या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या खबºयाकडून नांदेड शहरात एका युवकाकडे चोरीची दुचाकी असून त्याच्या साथीदाराने देगलूर, मुखेड, बिलोली आदी ठिकाणांहून अनेक दुचाकी आणि जीप चोरल्या आहेत़ अशी माहिती मिळाली होती़ त्यानंतर गुरमे यांनी एक पथक तयार केले़ चोरीची दुचाकी घेऊन फिरणाºया तरुणाच्या अगोदर मुसक्या आवळल्या़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने इतर साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली़ त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेने सहा जणांना ताब्यात घेतले होते़
त्यामध्ये महम्मद फारुख ऊर्फ अफसर महम्मद रोशा खा ऊर्फ जाफरखा रा़ इराकुंटा तेलंगणा, शेख फेरोज शेख रफीक रा़सुतारगल्ली ता़बिलोली, अस्लम सत्तार कुरेशी रा़इदगाह गल्ली ता़बिलोली व शेख इम्रान शेख बाबा शेख मकदूम रा़ नवी आबादी ता़बिलोली यांना पकडले़ त्यांनी नांदेड व जिल्हा तसेच देगलूर, बिलोली, मुखेड, उदगीर, लातूर, कर्नाटक, हैदराबाद या ठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ तसेच उदगीर येथे तोंडचिर शिवारात दरोडा टाकून महिंद्रा बोलेरो जीप पळविल्याचेही ते म्हणाले़ या आरोपींकडून पोलिसांनी १९ दुचाकी आणि एक महिंद्रा बोलेरो असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी़डी़ भारती, पोउपनि दिनेश काशीद, पोहेकॉ़ माणिक हंबर्डे, वाघमारे, जावेद, रहेमान, शहाणे यांनी ही कारवाई केली़ आरोपींकडून अन्य गुन्हेही उघडकीस येऊ शकतात़

Web Title: antararaajayaiya-taolailaa-pakadalae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.