अजिंठा, वेरुळ लेणींना भरडधान्य, साळीचा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 07:22 AM2023-11-20T07:22:54+5:302023-11-20T07:23:31+5:30

तेव्हा वापरलेल्या वनस्पती झाल्या लुप्त

Ajanta, Verul Caves are rich in grain, Saaj of Sali | अजिंठा, वेरुळ लेणींना भरडधान्य, साळीचा साज

अजिंठा, वेरुळ लेणींना भरडधान्य, साळीचा साज

लोकमत न्यूज नेटवर्क  
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेणीत पेंटिंग, प्लास्टरसाठी येथीलच भरडधान्य, चंदन बटवा, साळी अशा विविध वनस्पतींचा वापर करण्यात आला. मात्र, काळाच्या ओघात जगप्रसिद्ध लेणी साकारण्यासाठी वापरलेल्या वनस्पती येथून लुप्त झाल्या. पर्यावरणात बदल झाला. वारसास्थळे जपण्यासाठी पूर्वीप्रमाणेच काम करावे लागेल, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे सेवानिवृत्त अधीक्षक पुरातत्वविद रसायनतज्ज्ञ डाॅ. मॅनेजर सिंह यांनी सांगितले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे रविवारी बीबी का मकबरा परिसरात आयोजित कार्यक्रमात जागतिक वारसा सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. सिंह बोलत होते. अध्यक्षस्थानी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक डाॅ. वि. ल. धारूरकर होते

प्लास्टरमध्ये करण्यात आला भांगचा वापर   
डाॅ. मॅनेजर सिंह म्हणाले, जगात पहिल्यांदा वेरुळच्या लेणीत प्लास्टरमध्ये भांगचा वापर झाला. यामुळे किड्यांपासून स्थळाचे संरक्षण होण्यास मदत झाली. 
चंदन बटवा, साळी (तांदूळ), कोदो (भरड धान्य) यांचाही लेणीत वापर झालेला आहे. म्हणजे या वनस्पती पूर्वी येथे होत्या.

२५ छायाचित्रांतून देशाची सफर
nजागतिक वारसा सप्ताहानिमित्त बीबी का मकबरा येथे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 
nयात देशभरातील २५ स्थळांची छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

Web Title: Ajanta, Verul Caves are rich in grain, Saaj of Sali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.