काँग्रेस नेत्यांच्या गाडीला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:25 AM2017-08-14T06:25:47+5:302017-08-14T06:26:16+5:30

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संजय चौपाने (५५, रा. ठाणे) यांचे निधन झाले.

Accident of Congress leader's car | काँग्रेस नेत्यांच्या गाडीला अपघात

काँग्रेस नेत्यांच्या गाडीला अपघात

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संजय चौपाने (५५, रा. ठाणे) यांचे निधन झाले. तर नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.
औरंगाबाद येथील स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळा आटोपून हे सर्व जण फॉर्च्युनर गाडीतून मुंबईकडे परतत असताना रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. मोटारसायकलस्वाराला वाचविताना गाडीचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती दुभाजकावर आदळून बाजूच्या रस्त्यावरून औरंगाबादकडे जाणाºया खासगी बसला धडकली. या अपघातात गाडीतील संजय चौपाने जागीच ठार झाले. तर रमाकांत म्हात्रे, बाळकृष्ण पूर्णेकर, दत्ता म्हात्रे, दलजित बिस्त हे जखमी झाले. या जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी तातडीने औरंगाबादला हलविले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मूळ यवतमाळचे रहिवासी असलेले संजय चौपाने हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते ठाण्यात राहत होते.
।ठाणे कॉँग्रेसवर शोककळा
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून काँग्रेस प्रदेश सचिव संजय चौपाने यांची ओळख होती. युवक काँग्रेसपासून पक्षात सक्रिय असलेले चौपाने यांनी युवक काँग्रेसमध्येही सचिव पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.
पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा वावर असे. याचदरम्यान त्यांची ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून नेमणूक झाली. सध्या ते महाराष्टÑ प्रदेश सचिव होते. त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने ठाणे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त समजताच काही नेते औरंगाबादला रवाना झाले.
।त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेकांना धक्का बसला.

Web Title: Accident of Congress leader's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.