बजाजनगरात अल्पवयीन मुलास तिघांची मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:14 PM2023-02-04T18:14:47+5:302023-02-04T18:15:11+5:30

तिघांनी अचानक शिवीगाळ करत केली मारहाण

A minor was beaten up by three in Bajajnagar; The video went viral | बजाजनगरात अल्पवयीन मुलास तिघांची मारहाण; व्हिडीओ व्हायरल

बजाजनगरात अल्पवयीन मुलास तिघांची मारहाण; व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

- मेहमूद शेख
वाळूज महानगर (औरंगाबाद) :
भावाला भेटण्यासाठी जाणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलास रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.२) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकरणी मुख्य आरोपी व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लक्षदिप चंद्रकांत गोरे (१७, रा.सिडको वाळूजमहानगर) हा बजाजनगरातील एका खाजगी शाळेत शिक्षण घेतो. गुरुवार (दि.२) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास लक्षदिप गोरे हा बजाजनगरात आपल्या भावाला भेटण्यासाठी चालला होता. शहीद भगतसिंग शाळेजवळ आदित्य बाविस्कर, त्याचा अल्पवयीन भाऊ तसेच साथीदारांनी लक्षदिप यास रस्त्यात अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लक्षदिप समजावून सांगत असताना तिघांनी त्यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आदित्य बाविस्करने लोखंडी पाईप, सिमेंटचा गट्टु डोक्यात मारुन लक्षदिपचे डोके फोडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या लक्षदिपने बचावासाठी आरडा-ओरडा केला. यावेळी अक्षय राठोड व इतरांनी धावून जात लक्षदिपची सुटका केली. यानंतर हल्लेखोर तिघेही घटनास्थळावरुन पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या लक्षदिप गोरे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
बजाजनगरात लक्षदिप गोरेस मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आदित्य बाविस्कर व त्याचे दोन साथीदार हे लक्षदिप यास बेदम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे.  तसेच मध्यस्थी करणाऱ्यांना दमबाजी करीत असल्याचे कैद झाले आहे. या प्रकरणी लक्षदिप गोरे याच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारा आदित्य बाविस्कर (रा.बजाजनगर) व दोन अल्पवयीन मुलाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.विलास वैष्णव हे करीत आहे.

Web Title: A minor was beaten up by three in Bajajnagar; The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.