१६ लाख रूपये ‘मातीत’; क्रीडा संकुलातील लॉनचा मांडला ‘खेळ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:39 AM2017-07-26T00:39:17+5:302017-07-26T00:40:26+5:30

बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन वर्षांपूर्वी मुख्य मैदानात १६ लाख रूपये खर्चून लॉन करण्यात आले होते. परंतु केवळ अधिकाºयांच्या हालगर्जीपणामुळे हे लॉन देखभालीअभावी खराब झाले आहे

16-laakha-rauupayae-maataita-karaidaa-sankaulaataila-laonacaa-maandalaa-khaela | १६ लाख रूपये ‘मातीत’; क्रीडा संकुलातील लॉनचा मांडला ‘खेळ’!

१६ लाख रूपये ‘मातीत’; क्रीडा संकुलातील लॉनचा मांडला ‘खेळ’!

googlenewsNext
ठळक मुद्देदेखभालीसाठी आलेला १३ लाख रूपयांचा निधी क्रीडा अधिकाºयांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकारक्रीडा कार्यालयातील ‘खेळा’ची बाहेर वेगळीच चर्चा सुरू

सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन वर्षांपूर्वी मुख्य मैदानात १६ लाख रूपये खर्चून लॉन करण्यात आले होते. परंतु केवळ अधिकाºयांच्या हालगर्जीपणामुळे हे लॉन देखभालीअभावी खराब झाले आहे. विशेष म्हणजे देखभालीसाठी आलेला १३ लाख रूपयांचा निधी क्रीडा अधिकाºयांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वरिष्ठांकडून साधी विचारपूसही झाली नाही. त्यामुळे क्रीडा कार्यालयातील ‘खेळा’ची बाहेर वेगळीच चर्चा सुरू आहे.
शहरात खेळांच्या मैदानासाठी अपेक्षेप्रमाणे कोठेच मोठे मैदान नाही. शहरात एकमेव जिल्हा क्रीडा संकुल आहे. त्यामुळे .येथे शहराच्या कानाकोपºयातून खेळाडू विविध खेळ खेळण्यासाठी येतात. तसेच तालुक्यापासून ते राष्ट्रीय स्पर्धा या संकुलात होतात. त्यामुळे येथे हजारो खेळाडूंची येथे येजा असते. परंतु येथे आल्यानंतर केवळ अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे खेळाडूंना कुठल्याच सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.
खेळांची आणि खेळाडूंची संख्या पाहून गत दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांच्या कार्यकाळात जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठी तब्बल ६० लाखांचा निधी आला होता. यासंदर्भात कामेही झाली होती. त्यानंतर त्यांची बदली झाली आणि परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकाºयांकडे बीडचा पदभार देण्यात आला. काही दिवस हे कार्यालय प्रभारींवरच राहिले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नंदा खुरपुडे रूजू झाल्या आणि कार्यालयाचे सर्व कामकाजच विस्कळीत झाले. आठवड्यातून दोन दिवस कार्याल्यात थांबायचे आणि बाकी दिवस विविध कारणांनी रजेवर रहायचे, असे नियमित सुरू राहिले. याचा फायदा घेत येथील जिल्हा क्रीडा अधिकारी एन.बसे यांनी खाजगी लोकांना हाताशी धरून कार्यालयाच्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केला.
‘तो’ बसे यांचाच माणूस?
कार्यालयातील कॅश बुक फाडणारा सचिन विभूते हा क्रीडा अधिकारी एन.बसे यांचाच माणूस होता. त्यांनीच त्याला ३०० रूपये प्रती दिन रोजगार देऊन ठेवल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. हा सर्व प्रकार बसे यांच्या सांगण्यावरूनच केल्याचीही माहिती आहे. योजनांतील घोटाळे तसेच लेखा परीक्षणात त्रुटी आढळू नयेत, यासाठी बसे यांनी हा प्रकार करण्यास विभूतेला भाग पाडले. त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केली आहे.

Web Title: 16-laakha-rauupayae-maataita-karaidaa-sankaulaataila-laonacaa-maandalaa-khaela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.