धाडसत्राने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

By admin | Published: August 1, 2016 12:36 AM2016-08-01T00:36:42+5:302016-08-01T00:36:42+5:30

दररोज कुठे ना कुठे, अवैध दारू विक्रेत्यांवर पाळत ठेवून मुद्देमालासह अटक केली जात असल्याने ...

Thousands of liquor vendors feared tremors | धाडसत्राने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

धाडसत्राने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Next

१० लाखांचा माल जप्त : तिघांना पोलीस कोठडी
ब्रह्मपुरी : दररोज कुठे ना कुठे, अवैध दारू विक्रेत्यांवर पाळत ठेवून मुद्देमालासह अटक केली जात असल्याने या धाडसत्रामुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. शनिवारी झालेल्या कारवाईत आशिष विश्वनाथ धोंगडे रा. नागभीड, रवी रमय्या कुल्लूरवार रा. ब्रह्मपुरी व आशिष पांडुरंग परशुरामकर रा. पिंपळगाव (कोहली) यांना मुद्देमालासह अटक केली. तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
३० जुलैच्या मध्यरात्री गांगलवाडी रोडवर झालेल्या कारवाईत ४० पेट्या देशीदारू महा-३४ एआर-७३६४ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनासह पकडली. यात आशिष विश्वनाथ घोंगडे व रवी रमय्या कुल्लूरवार रा. ब्रह्मपुरी यांना अटक करण्यात केली. तर त्याच रोडवर काही वेळातच दुचाकी वाहन पकडून आशिष पाडुरंग परशुरामकर रा. पिंपळगाव (कोहळी) ता. लाखांदूर याला देशी दारु नेताना रंगेहाथ पकडले आहे. या तिघांनाही ब्रह्मपुरीच्या न्यायालयात हजर केले असता १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दररोजच्या या धाडसत्राने पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर यांचा दरारा निर्माण होऊन अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक खैरकर, एपीआय खंडाळे व कर्मचाऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

वाहनासह तीन लाखांची दारु जप्त
वरोरा : वरोरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने नाकेबंदी करुन आनंदवन चौकात एक वाहन अडवून तपासणी केली असता वाहनात एक लाख ६१ हजार रुपयाची विदेशी दारू आढळून आली. वाहनासह दारू जप्त करून एका व्यक्तीस अटक केली. वरोरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास नागपूर वरुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका वाहनात दारु असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वरोरा येथील आनंदवन चौकात नाकेबंदी करुन एमएच-३२ झेड- ९५९५ या वाहनाची तपासणी केली असता, दारू आढळली. वाहनातील आकाश चौधरी यास ताब्यात घेवून अटक केली तर एक जण फरार झाला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनिष दुबे, अशोक ढोक, मदन येरणे, घनश्याम फरकाडे, राकेश तुराणकर, निखील कौराने, सचिन साठे, श्रीकांत नागोसे आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)

दुचाकी वाहनासह १९ हजाराची दारू जप्त
शंकरपूर : येथील पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी वाहनासह १९ हजाराची दारु पकडली. भिवापूर येथून देशी दारू येथे असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शंकरपूर-हिरापूर या रस्त्या दरम्यान नाकेबंदी केली. मध्यरात्री १२ वाजता एक दुचाकी वाहन येत असल्याने दुचाकी थांबविण्यात आली. या दुचाकी वाहनात १९ हजार २०० रुपयाच्या १९२ देशी दारूच्या निप्पा आढळल्या. दुचाकी वाहन जप्त करून आरोपी भीवापूर येथील भारतसिंग भगतसिंग जुनी (२२) याला अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चहांदे, पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे, हवालदार पठाण, ज्ञानबोनवार, चाफले यांनी केली..

Web Title: Thousands of liquor vendors feared tremors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.