चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा-बोडधा रस्त्यावर वाघाचा सहा तास डेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:09 IST2019-02-07T14:09:00+5:302019-02-07T14:09:26+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा-बोडधा रोडवर बुधवारी एक पट्टेदार वाघ तब्बल ७ तास फिरत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये दहशत पसरली.

चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा-बोडधा रस्त्यावर वाघाचा सहा तास डेरा
ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये दहशत
रवी रणदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा-बोडधा रोडवर बुधवारी एक पट्टेदार वाघ तब्बल ७ तास फिरत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये दहशत पसरली.
हा वाघ रस्त्याच्या कडेनेच फिरत असल्याची माहिती पसरल्यांने काही काळ हा रस्ता निर्मनुष्य झाला. हळदा येथील प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हा वाघ रोडवरून तब्बल अर्धा किमी अंतरापर्यंत फिरत होता.मागील काही वषार्पासून हळदा-आवळगांव परिसरात वाघाचे सतत हल्ले होत आहेत. यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली असून, यातून शेती उत्पन्न प्रभावित झाले आहे.