रोप वाटपात मूलचे सामाजिक वनीकरण अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:36 PM2018-12-17T22:36:47+5:302018-12-17T22:37:09+5:30

शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही तालुक्यात रोपांचे वाटप करण्यासाठी येथील सामाजिक वनिकरण विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मागील वर्षात दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त रोपांची लागवड करून ग्रामपंचायत, वनविभाग व खाजगी वितरण करण्यात आले आहे.

Root Distribution Original Social Forestry Leading | रोप वाटपात मूलचे सामाजिक वनीकरण अग्रेसर

रोप वाटपात मूलचे सामाजिक वनीकरण अग्रेसर

Next
ठळक मुद्दे३३ कोटी वृक्षलागवडीची तयारी

भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही तालुक्यात रोपांचे वाटप करण्यासाठी येथील सामाजिक वनिकरण विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मागील वर्षात दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त रोपांची लागवड करून ग्रामपंचायत, वनविभाग व खाजगी वितरण करण्यात आले आहे. यावषीर्ही रोप लागवड करण्यात सामाजिक वनिकरण विभाग अग्रेसर आहे. सामाजिक वनिकरण विभागामुळे वृक्षलागवडीला जिल्हयात मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवड करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीन विशेषत: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. येथील सामाजिक वनिकरण विभागाच्या दोन रोपवाटीकांमधून रोप लागवड मोठया प्रमाणावर करण्यात येत आहे. सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी यांच्या मार्गदर्शनात मूलचे क्षेत्र सहाय्यक बि. एन. नैताम व सिंगापूरचे क्षेत्र सहाय्यक एस. एन. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मागील वर्षी जानाळा आणि सिंगापूर येथील रोपवाटीकेत सहा लाख ७८ हजार रोपांचे वाटप करण्यात आले. शासनाने मागील वर्षी पाच लाखांचे टार्गेट मूल येथील सामाजिक वनिकरण विभागाला दिले होते, मात्र त्यापैकी अधिक रोपाचे वाटप करण्यात आले.
सामाजिक वनिकरण विभागाने वनविभागाव्यतिरीक्त विविध ग्रामपंचायतींना रोपांचे वाटप केले आहे. यासोबत खासगी विक्री करण्यात आले आहे. मागील वर्षी वनविभागाला तीन लाख ६३ हजार ७५३ रोप देण्यात आले. मूल व सावली तालुक्यातील ग्राम पंचायतीला दोन लाख १८ हजार ६९३ रोपे वाटप करण्यात आले तर २७ हजार ७०९ रोपांची खासगी विक्री करण्यात आली व लावगडीसाठी ५९ हजार ६४५ रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
वाटप झालेली रोपे
साग ३९४५, बांबु १५४१०, सीताफळ ५८०७, आवळा १५२१२, बेहळा ५८५४, पा.सिरस ३८५४, कवठ १०९९५, पेल्टाफरस ८११९, सिसम ३१५०, निम ३५८३०, षेवगा ३२००, रेंन्ट्री ३७९५, वि. चिंच ५५०, जांभुळ ४४८२, कार्कोनिया १८५०, चिंच ४६५५, करंज २४४६७, सिसु २५९८९, खैर १२९६, अंजन २७९०, रिठा ६००, कॅषिया ५७३५, अमलतास ५५०, गुलमोहर १७५०, फणस १०७८, बोर २०९०, मोहा २६०१, पेरू १८७१, वड ५१६, पिंपळ ११८०, निंबु ११४, आंबा ३०२१, पा. सोनिया ३४३, पळस ४००० रोपांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Root Distribution Original Social Forestry Leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.