इतरांना दोष देताय?-पण चूक नक्की कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:40 PM2017-08-31T13:40:12+5:302017-08-31T13:44:31+5:30

आपलं चांगलं झालं तर इतरांना त्याचं क्रेडीट देतो का? मग काही चुकलं तर दोष इतरांचा कसा?

Do you blame others? -What exactly is wrong with you? | इतरांना दोष देताय?-पण चूक नक्की कुणाची?

इतरांना दोष देताय?-पण चूक नक्की कुणाची?

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्णय कुठलाही असो त्याचे चांगलेवाईट परिणाम असतातच. ते पेलण्याची तयारी हवी.स्वतःतही बदल करण्याची इच्छाशक्ती हवी.

-योगिता तोडकर

मनीषा माझ्याकडे समुपदेशनासाठी येत होती. तिच्या वैवाहिक आयुष्यात ती समाधानी नव्हती. सुरवातीच्या दोन सत्रांमध्ये तिने तिच्या अडचणी मला सांगितल्या, त्याला अनुसरून आमच्यात चर्चादेखील चालू होती. पण तिची आजची वाक्य मात्न थोडी विस्मयकारकच होती. ती म्हणाली, माझ्या आई वडिलांमुळे माझं वाटोळं झालं, त्यांनी मला चांगलं स्थळ पाहून दिल असतं तर माझे असे हाल झाले नसते. आणि त्यात हा समाज, ठराविक वयातच लग्न व्हावं, असच व्हावं आणि काय काय..

मी तीचं शांतपणे ऐकून घेतलं व म्हटलं,  अग अश्या प्रकारचे निर्णय कोणी आपल्यासाठी घेतं तेंव्हा त्यातून काही वाईट घडावं या उद्देशाने थोडीच निर्णय घेतले जातात. असे निर्णय आपल्याला नेमकं काय देणार हे वेळच ठरवते.

दुसरी गोष्ट तुझे लग्न करून देताना तुझं मत विचारातच घेतलं नव्हते का? त्यावर ती म्हणाली, ‘तसं बरं होतं स्थळ, नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं म्हणून मी हो म्हटलं. आणि मला काय माहित होतं पुढे जाऊन इतका त्रास होईल’’.

म्हणजे पहा की, मनीषाचं वैवाहिक आयुष्य चांगलं चालू असतं, सारं उत्तम असतं तर तिनं घरातल्यांना, किंवा समाजाला अथवा स्वतर्‍च्या निर्णयाला नावं ठेवली असती का? किंवा चांगलं झालं याचं क्रेडीट कुणाला दिलं असतं का?

तर नाही.

कारण मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कि स्वतर्‍साठी निर्णय आपण स्वतंत्नपणे घेतला आहे की सगळ्यांबरोबर मिळून घेतला आहे? आणि कसाही घेतला तरी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणाम होणार आहेतच.  त्यामुळे होणारे परिणाम चांगले असोत वा वाईट त्याची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. त्यासाठी दुसर्‍याला जबाबदार धरण्यात काय मजा, आणि तसेही परिणामांना तोंड तुम्हाला द्यायचंच आहे मग दोषारोपांचा खेळ करत बसण्यात काय अर्थ?

आणखी महत्वाची गोष्ट भले घेतलेले निर्णय बदलता येणार नसतात, पण त्यातून मार्ग शोधून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळता येऊ शकते.

आज काही गोष्टी घडवून आणल्या तर उद्या नक्कीच छान असू शकतो. कालसाठी रडत बसण्यात काय अर्थ? निर्णय घेताना काय चुकलं हे समजून घेऊन चालू परिस्थितीनुसार त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करायला हवा. गरज असल्यास स्वतर्‍मध्येही  काही बदल करायला हवेत. ज्यामुळे तुमचे व तुमच्या अवतीभोवती असणार्‍यांचे आयुष्य सुकर होईल.

कुठल्याही निर्णयाचे नकारात्मक परिणाम समोर आल्यास दुसर्‍याच्या बाबतीत वकील व स्वतर्‍च्या बाबतीत न्यायाधीश बनू नका. प्रत्येक निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घ्या. आणि त्याला अनुसरून परिस्थितीत  व स्वतर्‍मध्ये बदल घडवून आणा.

अन्यथा इतरांना दोष देण्यापलिकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.

 

( लेखिका समुपदेशक आहेत.)

yogita1883@gmail.com

Web Title: Do you blame others? -What exactly is wrong with you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.