लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळांना झळाळी!

By admin | Published: April 2, 2017 04:43 PM2017-04-02T16:43:47+5:302017-04-02T16:43:47+5:30

मोताळा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकत असून, एकापेक्षा एक गुणवत्तेचे पाऊल पुढे टाकत आहे.

Zilla Parishad's school from the public welfare! | लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळांना झळाळी!

लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळांना झळाळी!

Next

मोताळा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकत असून, एकापेक्षा एक गुणवत्तेचे पाऊल पुढे टाकत आहे. यासाठी शिक्षकांसह लोकसहभागाचा वाटा महत्वाचा दुवा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना
मिळावी यासाठी प्रयत्न करीत असलेल्या खेडी (पान्हेरा) व टाकळी (वाघजाळ) येथील जिल्हा परिषद शाळांना लोकसहभागातून झळाळी मिळत आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्ञानरचनावाद व डिजिटल शाळेचे वारे वाहत असून, खेडी व टाकळी वाघजाळ येथील जिल्हा परिषद शाळांची आयएसओकडे  घौडदौड सुरू आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे. अनेक शिक्षक पदरमोड करीत अतिरिक्त वेळ देऊन शाळेला डिजिटल बनविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीसह लोकसहभागाचा वाटा मिळविण्यासाठी परिश्रम घेत आहे. खेडी येथील शाळेला आयएसओचा दर्जा मिळाविण्यासाठी शिक्षकांनी कंबर कसली असून, आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी शिक्षकांनी लोकसहभागातून आर्थिक रक्कम जमा करण्यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांसह दानदात्यांच्या प्रत्यक्ष भेटी, चर्चा सत्र व जनजागृती करून जास्तीत जास्त लोकसहभागाची रक्कम कशी मिळेल यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी अशोक लांजुळकर या शिक्षकांचा वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांची पत्नी कल्पना लांजुळकर कार्यरत असलेल्या खेडी येथील शाळेला या उदात्त हेतून वाढदिवसाचा खर्च टाळून १० हजार रूपयांची रोख मदत दिली. बुधवारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानाभाऊ  मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  कार्यक्रमात अशोक लांजुळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १० हजाराची रोख रक्कम मुख्याध्यापक कल्पना अशोक लांजुळकर यांना सुपुर्द करण्यात आली. या प्रसंगी शिक्षक परेश पडोळकर, शिक्षिका अनिता वैराळकरसह उमेश लाजगे, खुुरसिंग मोरे, भरत मोरे, सुरेश डुकरे व गावकरी उपस्थित होते.

टाकळी शाळेस सैनिकाने दिली ५ हजाराची मदत
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत टाकळी (वाघजाळ) येथील मराठी प्राथमिक शाळेने गरूड झेप घेतली असून, भौतिक सुविद्यांबरोबरच गुणात्मक विकासाचा आलेख चढत ठेवल्याने या मराठी प्राथमिक शाळेची आयएसओकडे वाटचाल सुरू झाली आहे. भारतीय सैन्यात सेवेत असलेले परमेश्वर महादेव शिराळ यांनी शाळेला आयएसओ मानांकनाच दर्जा मिळावा यासाठी बुधवारी ५ हजाराची मदत दिली. पुढील आठवड्यात पुन्हा ६ हजाराची मदत करण्याचे त्यांनी मुख्याध्यापक  अशोक राजनकर यांना आश्वासन दिले. सैन्यदलातून नियमित रजेवर आल्यानंतर सदर शाळेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचा कायापालट झालेला त्यांनी पाहिला. शाळेची गरूड झेप पाहून प्रभावित  झाले. यावेळी मुख्याध्यापक राजनकर यांनी भौतिक सुविद्या व आयएसओ साठी होणाऱ्या खर्चाची जाणीव करून दिली. लगेच त्यांनी ५  हजार रूपयांची मदत मुख्याध्यापकांच्या सुपुर्द केली. या प्रसंगी रूमाल टोपीसह गुलाब पुष्प देऊन सैनिक शिराळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पभूधारक शेतकरी प्रेमकुमार धुरंधर यांनीही २ हजार रूपयांची मदत देऊन समाजाला सम्यक दृष्टिकोण दिला. यावेळी शा.व्य.स. अध्यक्ष अरविंद मारोडकर, सौ. वर्षा अशोक राजनकर, स. अ. कुमारी अनिता सोनोने, स.अ. सोपान शिराळसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad's school from the public welfare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.