लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी, प्रकटदिन महोत्सव महोत्सवाला भाविकांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 01:45 PM2018-02-07T13:45:28+5:302018-02-07T13:45:38+5:30

गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला.

Visakhdin Mahotsav celebrates Holi with the blessings of thousands of devotees | लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी, प्रकटदिन महोत्सव महोत्सवाला भाविकांची मांदियाळी

लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी, प्रकटदिन महोत्सव महोत्सवाला भाविकांची मांदियाळी

Next

शेगाव :  'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला. यागाची पूर्णाहूती व अवकृतस्नान कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील (व्यवस्थापकीय विश्वस्त, गजानन महाराज संस्थान) यांच्याहस्ते झाली. ह.भ.प. श्रीरामबुवा ठाकूर यांचे सकाळी १० ते १२ किर्तन झाले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 
या प्रकटदिनोत्सवाला १ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली, असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत.  या प्रकट दिनानिमित्त एक फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल  एक हजाराच्यावर  दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी १२ वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पूणार्हूती संपन्न झाली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील, कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, रमेश डांगरा, गोविंद कलोरे, अशोकराव देशमुख, किशोर टांक, चंदूलाल अग्रवाल, प्रमोद गणेश आदी उपस्थित होते. संस्थानच्यावतीने २ लाखावर भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. नागपूर टिमकी श्रीभक्त मंडळाच्या वतीने वारकºयांचे पादत्राणे विनामुल्य ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

श्रींची भव्य नगर परिक्रमा
श्रींच्या १४० व्या प्रकटदिनी श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता रथ, मेणा, गज अश्वासह  नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींची पालखी दत्तमंदिर, हरहर शिवमंदीर श्री शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे पकटस्थळ, श्री मारोती मंदीर बाजार विभाग, बसस्थानक व्यापारपेठ मार्गे श्रींची पालखी काढण्यात आली. शिवमंदीर, श्री प्रकटस्थळ, श्री मारोती मंदीर येथे विश्वस्तांच्याहस्ते पुजा करण्यात आली. यावेळी शहर ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने चहा, नाश्टा, फराळ, व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. प्रकट दिनानिमित्त भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला.  वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग व्यवस्थाही शहरात ठिकठिकाणी कर्म्याट आली होती. दिंड्यांच्या आगमनामुळे विदर्भपंढरीत भक्तीमय वातावरण झाले होते.

Web Title: Visakhdin Mahotsav celebrates Holi with the blessings of thousands of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.