बोंडअळीच्या अनुदानासाठी 'स्वाभिमानी' चे  'शोले स्टाईल'आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 05:57 PM2018-11-02T17:57:29+5:302018-11-02T17:57:57+5:30

बोंड अळीचे अनुदान द्यावे यासाठी 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेने खामगाव उपविभागीय कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

'Swail-style' movement of 'Swabhimani' at khamgaon | बोंडअळीच्या अनुदानासाठी 'स्वाभिमानी' चे  'शोले स्टाईल'आंदोलन 

बोंडअळीच्या अनुदानासाठी 'स्वाभिमानी' चे  'शोले स्टाईल'आंदोलन 

Next

खामगाव : खामगाव तालुकायतील बोंड अळीच्या तिसऱ्या टप्प्याचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.  त्यामुळे  शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली  आहे. त्यामुळे सरकार ने तात्काळ पाऊल उचलून शेतकऱ्यांना बोन्ड अळीचे अनुदान द्यावे यासाठी 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेने खामगाव उपविभागीय कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दिवाळी आधी अनुदान मिळालं नाही तर दिवाळी उपविभागीय कार्यलयावरच साजरा करू असा इशारा सुद्धा या वेळी त्यांनी दिला आहे.यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्याच्या घरात अंधार राहण्याचे असल्याने दिसून येत आहे.सतत च्या नापिकी मुळे घरात पैसा नाही आतापर्यंत कधीच न पाहिलेला दुष्काळाचे तुकडे या सरकारने केले आहे.दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण येत्या पाच ते सहा दिवसावर येऊन ठेपला आहे तरी बोड अळी चे अनुदान शेतकऱ्याला मिळाले नाही.गेल्या ४ वर्षी पासून सोयाबीनचे २०० रुपय अनुदान अद्याप मिळाले नाही.कर्ज माफीच्या लिस्ट मध्ये नाव असून सुद्धा कर्ज माफ झाले नाही. दुष्काळाची झळा सोसात असलेला शेतकरी अनुदान पासून वंचित आहे त्यामुळे स्वाभिमानी ला अनुदान मिळण्यासाठी आक्रमक पवित्र घेऊन खामगाव येथील उपविभागीय कार्यालय वर चडून 'शोले' आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास फाटे,तालुका अध्यक्ष राजू नाकाळे,श्रीकृष्ण काकडे,प्रकाश पाटील , गजानन पटोकार,रोहन देशमुख ,सोपान खंडारे,संजय बोचरे,अमीर शाहा ,चंदू राहणे रमेश यादगिरे यांनी हे आंदोलन केले.

Web Title: 'Swail-style' movement of 'Swabhimani' at khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.